नांदेड। जिल्हयात बसस्थानक व शहरात प्रवास करतांना माहीलांचे गळयातील व पर्स मधील सोन्याचे दागीणे चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध करणेकामी मा. पोलीस अधिक्षक, श्रीकृष्ण कोकाटे साहेब यांनी स्थानीक गुन्हे शाखा नांदेड येथील पोलीस निरीक्षक यांना आदेश दिले होते.

स्थानीक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री उदय खंडेराय यांनी त्यांचे शाखेतील पोउपनि श्री दत्तात्रय काळे यांची टिम तयार करुन नांदेड जिल्हयातील बसमध्ये चढतांना व प्रवास करतांना महीलांचे दागीने चोरी करणारे गुन्हेगार यांचा शोध घेवुन चोरीचे गुन्हे उघडकीस आनण्याच्या सुचना दिल्या होत्या.

त्या अनुषंगाने पोउपनि श्री दतात्रय काळे व टिम यांनी बसस्थानक, रेल्वेस्टेशन इतर विवीध गर्दीच्या ठिकाणची माहीती हस्तगत करुन त्याचे विश्लेषन करुन तसेच गोपनीय माहीतगार यांचे कडुन माहीती घेवुन वोध्दीक कौशल्य वापरुन नांदेड जिल्हयात मोठ्या प्रमानात प्रवासा दरम्यान महीलांचे गळयातील पोत चोरी करणारी एक महिला व तीन इसम नामे 1) दुर्गा पि. मोहण हातवळने वय 28 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रमाईनगर देगलुर, 2) हिवराज पि. रामचंद्र उपाध्य वय 51 वर्षे व्यवसाय मजुरी रा. रमाईनगर देगलुर, 3) बालाजी ऊर्फ बली पि. गोविंद कोळगीरे वय 30 वर्षे व्यवसाय मजुरी रा. देगाव रोड देगलुर ता. देगलुर जि. नांदेड 4) प्रकाश तुकाराम वाघमारे वय 34 वर्षे व्यवसास मजुरी रा. कळसदाळ ता. भालकी जि. बिदर (कर्नाटक) ह.मु. देगलुर जि. नांदेड यांना नांदेड बसस्थानक येथुन ताब्यात घेवुन त्यांचे कडे विचारपुस करुन सखोल चौकशी केली असता त्यांनी पो.स्टे. वजिराबाद, इतवारा, शिवाजीनगर, बारड, कंधार, लोहा, माळाकोळी व माहुर या पो.स्टे. चे हाद्दीत चोरी केल्याचे सांगीतल्या वरुन रेकॉर्डची पहाणी केली असता एकुण 14 गुन्हे दाखल असल्याचे प्राथमीक तपासात दिसुन आले आहे. सदर गुन्हयातील चोरीस गेलेला मुद्देमाल आरोपीतांन कडुन खालील प्रमाणे जप्त करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही ही मा. श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक नांदेड, श्री अबिनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक नांदेड, श्री खंडेराव धरणे, अपर पोलीस अधिक्षक भोकर यांचे मार्गदर्शनाखाली, श्री उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक स्थागुशा, पोउपनि श्री दतात्रय काळे, पोलीस अमलदार गंगाधर कदम, बालाजी तेलंग, विलास कदम, गणेश धुमाळ, धम्मा जाधव, रंनधिरसिंह राजबंशी, गजानन बयनवाड, दिपक ओढणे, महीला अमलदार हेमलता भोयर, पंचफुला फुलारी, किरण बाबर, व चालक शेख कलीम, हनुमानसिंह ठाकुर यांनी पार पाडली असून सदर पथकाचे मा. पोलीस अधीक्षक यांनी कौतूक केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version