
नवीन नांदेड। नांदेड येथील गोदावरी अर्बन कोऑपरेटिव्ह बॅकेच्या तज्ञ संचालकपदी व इन्व्हेस्टमेंट कमिटीवर माजी नगरसेवक प्रा.अशोक मोरे यांच्यी नियुक्ती चेअरमन डॉ.आर.डी.देशमुख यांनी केली असून या नियुक्ती बदल मित्रमंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
२९ मे रोजी झालेल्या संचालक मंडळाचा सभेतील ठराव क्रमांक १४ नुसार गोदावरी अबन को ऑपरेटिव्ह बॅक लि. वजिराबाद नांदेड येथे बॅकेच्या संचालक मंडळावर आरबीआय चा निर्देशना प्रमाणे वाघाळा शहर महानगर पालिका माजी नगरसेवक अशोक मोरे यांच्यी नियुक्ती करण्यात आली.
सदरील नियुक्ती चेअरमन डॉ.आर.डी.देशमुख यांनी ५ जुन रोजी नियुक्ती पत्र देऊन अभिनंदन केले आहे. यावेळी कांचन परिहर, प्रा. डॉ.एस.एम.टाले,अनुप बिरादार,मोहमद इलियास, मेघा पतंगे,प्रफुल रेड्डी,शिवाजी जाधव, योगेश नांदेडकर, धम्मदीप ढोले, सौरभ पंतगे उपस्थित होते,या निवडीबद्दल आमदार मोहनराव हंबर्डे, आजी माजी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे.
