क्राईमनांदेड

ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत मोकळया जागेवर जुगार खेळणारा पाच जणांना अटक, दुचाकी सह दोन लाख अडुसष्ट हजार मुदेमाल जप्त

नादेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गाढेगाव जवळील पाण्याचा टाकी जवळ मोकळया जागेत चार्जिंग बल्प उजेडात काही ईसम तिरट नावाच्या जुगार खेळात असतांना अचानक छपा टाकला असता तिन जण पळून गेले तर पाच जणांना अटक दुचाकी व रोख रक्कम असा एकुण २ लाख ६८ हजार २६० रूपयाचा मुदेमाल ग्रामीण चा गुन्हे शोध शाखेचा पथकाने कार्यवाही केली असून या प्रकरणी पोहेकॉ विक्रम जळबाजी वाकडे यांच्या फिर्यादी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक,नागनाथ आयलाने, सहायक पोलिस निरीक्षक कांबळे, पोहेकॉ विक्रम वाकडे,पोहेको पांचाळ,पोहेकॉ सातारे, पोकॉ पालेपवाड,पोकों माधव माने असे दि.१५ मे २४ रोजी नोंद नंबर ०२,वेळ रात्री ००.४९ वाजता पोस्टे हददीत नाईट गस्त पेट्रोलिग करीत टायर बोर्ड कमान येथे आलो असताना गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गाडेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत चाजींगचे बल्बचे उजेडात काही लोक तिर्रट नावाचा जुगार खेळत आहेत.अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने आम्ही पंचासमक्ष वरील सर्वजन पंचासह माहिती मिळालेल्या ठिकाणी गाडेगाव रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ मोकळ्या जागेत ०१.३० वाजताचे सुमारास गेलो असता काही इसम गोलाकार बसुन पत्ते खेळत असताना दिसले.

आम्ही सर्वानी अचानक छापा मारला असाता तीन इसम आम्हास पाहुन पळुन गेले व ०५ इसमांना जागीच पकडुन पंचासमक्ष त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव महेमुद खान मनुखान पठाण वय ३८ वर्षे, व्यावसाय मजुरी रा. इकबाल नगर नांदेड, शेख मुख्तार शेख सतार वय ३७ वर्ष व्यवसाय मजुरी रा हबीबीया कॉलनी नांदेड ,असदखान बिसमीलाखान पठाण ,वय ४५ वर्ष व्यवसाय मजुरी रा इकबालनगर नांदेड शेख रहेमत शेख शादुला वय ४० वर्षे,व्यवसाय मजुरी रा. इकबालनगर ता.जि. नांदेड, शेख खदीर शेख महेमुद, वय ५७ वर्ष व्यवसाय नोकरी रा. इकबाल नगर असे सांगितले. सोबतचे दोन पंचासमक्ष त्यांची अंगझडती घेतली.

त्यांचे ताब्यात खालील प्रमाणे जुगाराचे साहीत्य व नगदी रुपये मिळून आले त्याचे वर्णन खालील प्रमाणे ३४००/- महेमुद खान मनुखान पठाण याचे ताब्यात ५०० रुपये दराच्या ०२ नोटा,१०० रुपये दराच्या ०४ नोटा, एक पांढ-या रंगाचा karbonn कंपनीचा कीपंड असलेला मोबाईल किंमती अंदाजे २०००/- व हातात तिन बदक छाप पत्ते,१०९९०/- शेख मुख्तार शेख सतार याचे ताब्यात ५०० रुपये दराच्या ०१ नोटा,१०० रुपये दराच्या ०४ नोटा व ५० रुपये दराच्या ०१ नोटा, २० रुपये दराच्या ०२ नोटा व एक निळया रंगाचा OPPO कंपनीचा अॅन्ड्रॉईड मोबाईल १०,०००/- किंमती अंदाजे व हातात तिन बदक छाप पत्ते ९१७०/- असदखान बिसमीलाखान पठाण याचे ताब्यातुन ५०० रुपये दराच्या ०१ नोट,२०० रुपये दराच्या ०२ नोटा,१०० रुपये दराच्या ०२ नोटा,५० रुपये दराच्या ०१ नोट,१० रुपये दराच्या ०२ नोटा व एक OPPO कंपनीचा काळ्या रंगाचा अॅन्ड्रॉईड मोबाईल ८०००/- किंमती अंदाजे व हातात तिन बदक छाप पत्ते,८१०० /-

शेख रहेमत शेख शादुला याचे ताब्यातुन५०० रुपये दराच्या ०१ नोट,२०० रुपये दराच्या ०२नोटा, १०० रुपये दराच्या ०२ नोटा, व एक VIVO कंपनीचा आकाशी रंगाचा अॅन्ड्रॉईड मोबाईल ७०००/- किंमती अंदाजे व हातात तिन बदक छाप पत्ते. ७४००शेख खदीर शेख महेमुद याचे ताब्यातुन २०० रुपये दराची ०१ नोट, १०० रुपये दराच्या ०२ नोटा, व एक SAMSUNG कंपनीचा फिकट हिरव्या रंगाचा अन्ड्रॉईड मोबाईल ७०००/- किमती अंदाजे व हातात तिन बदक छाप पत्ते ९२००/- एक लाल रंगाची मॅट ज्यावर एक VIVO कंपनीचा सोनेरी रंगाचा अॅन्ड्रॉईड मोबाईल ८०००/- किंमती अंदाजे,५०० रुपये दराच्या ०१ नोट,२०० रुपये दराची ०१ नोट,१०० रुपये दराच्या ०५ नोटा, व ३७ बदक छाप पत्ते. ३००००/- एक चॉकलेटी रंगाची होन्डा कंपनीची स्कुटी जिचा क्रमांक MH २६ BL ५४३७ असे क्रमांक असलेली स्कुटी जुवाकिंअं,६००००/- एक काळया रंगाची होन्डा शाईन कंपनीची मोटार सायकल जिचा क्रमांक MH २६ CB ८६९९,

मोटार सायकल जुवाकिंअं, ५००००/- एक काळया रंगाची बजाज कंपनीची पल्सर १५० मोटार सायकल जिचा क्रमांक MH २६ AU ७८५०असे क्रमांक असलेली मोटार सायकल जुवाकिं अं,८००००/- एक काळया रंगाची जिचेवर लाल पांढरे रंगाचे पटे असलेली होन्डा कंपनीची शाईन मोटार सायकल जिचा क्रमांक MH २६ CK ०६५७ असे क्रमांक असलेली मोटार सायकल जुवाकिं अंदाजीत रक्कम २६८२६०/- एकुण वरील वर्णनाचे जुगाराचे साहित्य व रोख रक्कम असा एकुण २,६८,२६०/- रुपयाचा मुददेमाल मिळुन आला. वरील आरोपी विरुध्द कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे. या प्रकरणी अधिक तपास पोका सांगळे हे करीत आहेत.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!