
नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत सार्वजनिक ठिकाणी व मुख्य रस्त्यावर दारू पिऊन गौधंळ घालणारा या ४१ जणांना पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने व अमलंदारानी विविध ठिकाणी ४१ जणांणा ताब्यात घेऊन अटक केली असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,१४ मे रोजी सायंकाळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत लातूर फाटा, ढवळे चौक,नांदेड ऊस्मानगर रोडवरील मोकळया जागेत, विष्णुपूरी परिसरातील अनेक भागात अवैधरित्या सार्वजनिक रोडवर व परिसरातील विविध भागात दारू पिऊन गौधंळ घालणारांया ४१जणांना गुन्हे शोध पथकाने व अमलंदारानी अटक केली असून, पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ११०,११७,नुसार गुन्हा दाखल केला असून या केलेल्या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे. हि मोहीम चालू राहील अशी माहिती पोलीस निरीक्षक आयलाने यांनी दिली.
