नांदेडमहाराष्ट्र

हिमायतनगर रेल्वे स्थानकाला नांदेड रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी दिली अचानक भेट

हिमायतनगर, अनिल मादसवार| नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील रेल्वे स्थानकाला नांदेड डिव्हिजन रेल्वे विभागाच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी बुधवार दि.०७ फेब्रुवारी रोजी अचानक भेट देऊन रेल्वे स्थानक व परिसराची पाहणी केली आहे. तसेच रेल्वे विभागाच्या जागेचे मोजमाप घेऊन रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या शेडच्या कामात होत असलेल्या दिरंगाई बाबत संबंधित ठेकेदाराला ताकीद देऊन वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने बांधकाम पूर्ण करा अश्या कडक सूचना दिल्या. न्यूजफ्लॅश ३६० डॉटइन ने सतत तीन दिवस हिमायतनगर रेल्वे स्थानकावर होत असलेल्या कामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करून रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी अशी सूचना बातमीच्या माध्यमातून केली होती. त्यानंतर आज अचानक भेट देऊन कामाची पाहणी करून संबंधितांना सूचना दिल्या आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस प्रशासन, रेल्वे बांधकाम विभागाचे संबंधीचे अभियंता, गुत्तेदार, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

न्यूजफ्लॅश ३६०डॉटइन ने शनिवारी दि.०३ रोजी हिमायतनगर रेल्वे “प्लॅटफॉर्मवर शेडसाठी खड्डे खोदून दोन महिने उलटले; काम जैसे थेच”….या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. तर दि.०४ फेब्रुवारी रोजीच्या अंकात “न्यूजफ्लॅशचा दणका; हिमायतनगर रेल्वे प्लॅटफॉर्मवरील शेडच्या कामाला झालीय सुरुवात” गज बांधी व फुटिंग भरण्याच्या कामात अनियमितता; वरिष्ठानी भेट देऊन पाहणी करावी या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन बुधवार दि.७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११.३० वाजता नांदेड डिव्हिजनच्या विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी अचानक हिमायतनगर रेल्वे स्थानकाला विशेष रेल्वेने भेट दिली.

रेल्वेतून उतरताच हिमायतनगर येथील मंदिर कमिटीच्या वतीने महाविरचंद श्रीश्रीमाळ यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व श्री परमेश्वराची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. मंदिर कमिटीच्या वतीने नव्याने होणाऱ्या रेल्वे स्थानक मुख्य कमानीवर श्रीक्षेत्र परमेश्वराची मूर्ती लावण्यात यावी अशी मागणी केली. मागणीला उत्तर देताना त्यांनी मूर्तीचा प्रश्न मार्गी लावू परंतु पावित्र जपण्याचे काम रेल्वे विभाग करू शकत नाही. मंदिर कमिटीला यासाठी पुढाकार घ्यावा लागेल तरच या मागणीचा विचार केला जाईल असे सांगून त्यांनी रेल्वे स्थानक परिसराची पाहणी केली. तसेच स्टेशन मास्तर यांना रेल्वे स्थानक परिसर स्वच्छ ठेवण्याच्या कडक सूचना दिल्या.

त्यानंतर रेल्वे स्थानक व परिसरात सुरू असलेल्या शेडच्या कामाच्या बाबतीत प्रकाशित झालेल्या बातम्यांची दखल घेऊन दोन महिन्यापासून खोदून ठेवलेल्या खड्ड्यात सुरु करण्यात आलेल्या फुटिंगच्या कामाची पाहणी केली. याप्रसंगी येथे सुरु असलेल्या कामातील हलगर्जीपणा आणि कामाचा दर्जा सुधारावा अशी मागणी भाजपा युवामोर्चा माजी तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी, मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष दत्ता शिराने, सामाजिक कार्यकर्ते दशरथ हेंद्रे यांनी केली. यावेळी विभागीय व्यवस्थापक नीती सरकार यांनी संबंधित ठेकेदाराला कामाच्या बाबतीत कोणती तक्रार आली नाही पाहिजे. रेल्वे स्थानकातील शेडचे व फाउंडेशनचे काम दर्जेदार पद्धतीने करा. खोदण्यात आलेल्या खड्डयांमुळे कोणत्याही नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन सुरक्षेची दृष्टीने लवकरात लवकर हे काम पूर्ण करा अशा कडक सूचना केल्या.

यावेळी हिमायतनगर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने जेष्ठ पत्रकार तथा दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रमुख परमेश्वर गोपतवाड, दैनिक सकाळचे बातमीदार प्रकाश जैन, यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गोविंद गोडसेलवार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. या निवेदनात रेल्वे स्थानकांचे दररोजचे उत्पन्न 1 लाख ७० हजारच्या आसपास आहे. दररोज विदर्भातील उमरखेड डेपोची बस दोन वेळा हिमायतनगर रेल्वे स्थानकावर प्रवाशी घेऊन येते. त्यामुळे हिमायतनगर तळवे स्थानकातून येतुन ये- जा करणाऱ्या प्रवाश्यांची संख्या वाढली आहे. हि बाब लक्षात घेता धनबाद एक्स्प्रेस गाडीला हिमायतनगर स्थानकावर थांबा देण्यात यावा. कोरोना काळापासून पासून बंद झालेले पार्सल ऑफिस चालू करण्यात यावे. नंदीग्राम एक्स्प्रेस नागपूर पर्यंत सोडन्यात यावी, हिमायतनगर रेल्वे स्थानकावर महिलांसाठी शौचालय व वेटिंग हॉल उपलब्ध करावे. रेल्वे स्थानक व रेल्वेत होणाऱ्या चोरीवर आळा घालण्यासाठी येथे पोलीस चौकी स्थापन करून जनरल वेटिंग हॉल उपलब्ध करून द्यावे.

रेल्वे स्थानक साफसफाई कर्मचारी नेमून घाणीचे साम्राज्य दूर करावे. नांदेड – किनवट पर्यंत शटल रेल्वे गाडी दररोज दोन ते तीन वेळा सोडण्यात यावी, टेम्भी रस्त्यापासून स्टेशन पर्यंत रेल्वेच्या हद्दीत रोड करण्यात यावा, रेल्वे स्थानकावर असलेली पाणी टंचाई दूर करून पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था करावी. अपंगत्व असलेल्या व्यक्तीना रेल्वेच्या सर्व सुविधा देण्यात याव्यात यासह अनेक मागण्या करण्यात आल्या. यावेळी मंदिर कमिटीचे संचालक, न्यूजफ्लॅश ३६०डॉटइनचे मुख्य संपादक तथा दैनिक गावकरीचे तालुका प्रतिनिधी अनिल मादसवार, संचालक संजय माने, संचालक विलास वानखेडे, संतोष गाजेवार, वामनराव मिराशे, गजानन हरडपकर, साहेबराव चव्हाण, पापा पार्डीकर आदींसह गावातील जागरूक नागरिक, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!
× How can I help you?