हिमायतनगर तहसील कार्यालयावर मुळ आदिवासी समाजाचा विविध मागण्यासाठी विराट मोर्चा धडकला
हिमायतनगर,परमेश्वर काळे| महाराष्ट्रातील धनगर समाजांना मूळ आदिवासी समाजामध्ये समाविष्ट करण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील तहसील कार्यालयावर बुधवार दि 13 डिसेंबर रोजी मूळ आदिवासी समाज बांधवांचा विराट मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चामध्ये घोषणा ,फलक घेऊन महिलासह विद्यार्थ्यीनी, विद्यार्थी व समाज बांधव नागरीकांचा मोठा सहभाग होता.
हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर मंगल कार्यालय मैदानात सकाळी १२ वाजता मूळ आदिवासी समाज बांधवांचा जमाव करण्यात आला. येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व जननायक बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून शहरापासून आदिवासी समाज बांधवांचा विविध मागण्याचा विराट मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आला होता. या मोर्चातील मुळ आदिवासी समाजाने धनगर जात, किंवा कोणत्याही जातीचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करू नये, धनगरांना आदिवासी च्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती तात्काळ रद्द करण्यात यावी.
धनगर जात व आदिवासी जमातीचा सर्वेक्षण करून टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, (tiss) राज्य शासनाला सादर केलेला अहवाल अधिवेशन वाचन करून जनतेसमोर आणावा, यासह हिमायतनगर येथील आदिवासी मुला मुलींचे वसतिगृह सर्व सुविधेसह स्वातंत्र्य इमारत बांधण्यासाठी शहरालगत जागा उपलब्ध करून द्यावी. यासह विविध मागण्यांसाठी मुळ आदिवासी समाजाचा विराट मोर्चा जननायक भगवान बिरसा मुंडा, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैल चित्रासह घोषाबाजी देत हिमायतनगर तहसीलवर धडकला होता.
विविध मागण्याचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी आदिवासी सल्लागार समितीचे दत्तात्रेय वाळके, भुजंगराव डवरे, नामदेव डुडुळे, शेषराव वाळकीकर, खोब्राजी वाळके, डॉ .डि. डि. गायकवाड, कांताराव धुमाळे, काशिनाथ मेंडके, उतम धुमाळे, गुणवंत टारपे, माधव डवरे, दत्ता कर्हाळे, रामदास भडंगे, वसंत डवरे, रोशन धनवे, अभिषेक खुपशे, सत्यवृत ढोले, मारोती बोथीगे, रामराव भिसे, किशोर धुमाळे, रघोजी डावरे, एकनाथ बुरकुले, संजय माझळकर, मारोती गवले, यांच्यासह महिला व आदिवासी समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते. आदिवासी समाज बांधवांच्या विविध मागण्याचा मोर्चा राष्ट्रीय महामार्गने निघाल्यानंतर तहसील कार्यालय ते हिमायतनगर मंगल कार्यालय कमानीपर्यंत रांग लागली असल्याचे चित्र पाहावयास मिळाले, दरम्यान आंदोलन शांततेत होण्यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता.