धर्म-अध्यात्मनांदेड
श्री परमेश्वर यात्रेतील अखंड हरीनाम सप्ताह समाप्ती दहीहंडी काला रोजी वाटपासाठी 8 कुंटल बुंदी प्रसादाची तयारी सुरू

हिमायतनगर। महाशिवरात्री महोत्सव 2024 निमित्ताने येथील श्री परमेश्वर मंदिरात सुरू असलेल्या अखंड हरीनाम विनापारायण सोहळा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अंतिम टप्प्यात आला असून, दि 14 गुरुवारी समारोप केला जाणार आहे. समारोप दिनी वितरित केल्या जाणाऱ्या बुंदीच्या प्रसादाची सुरुवात करण्यात आली असून, 8 कुंटल प्रसाद पैकींग करण्यासाठी स्वयंसेवी महिला मंडळींनी पुढाकार घेतला आहे.

हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेला महाशिवरात्री पासून सुरुवात झाली आहे, त्यानिमित्ताने मंदिरात अखंड हरिनाम वीना पारायण, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा भजन, हरिपाठ उत्साहात होत आहे. या धार्मिक कार्यक्रमाला महिला पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळत असून हा सप्ताह सोहळा आता अंतिम टप्प्यात आला आहे. सप्ताहाचा सामारोप गुरुवारी काल्याच्या कीर्तनाने होणार असून , दि.14 मार्च 2023 गुरुवारी हभप दत्तात्रेय महाराज फुलारी, लातूर यांच्या मधुर वाणीतून काल्याचं कीर्तन होणार आहे. तत्पूर्वी शहरातील मुख्य रस्त्याने ग्रंथराज ज्ञानेश्वरी ची भव्य कलश पालखी यात्रा टाळ मृदंगाच्या वाणीतून काढण्यात येणार आहे.

सप्तहला सुरुवात झाल्यापासून दररोज विविध समाज बांधवांच्या वतीने अन्नदान पंगतीचे आयोजन करण्यात आले असून, त्यामुळे मंदिरात येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचा लाभ मिळतो आहे. दरम्यान सुरू असलेल्या कार्यक्रमाचा समारोप दिनी होणाऱ्या दहीहंडी काला निमित्ताने वितरित केल्या जाणाऱ्या प्रसादासाठी 8 कुंटल बंदीच्या प्रसादाची व्यवस्था करण्यात आली असून, बुंदी प्रसाद पैकींग करण्यासाठी मंगळवारी महिला मंडळीच्या वतीने सुरुवात करण्यात आली आहे.
बुंदी प्रसाद पैकींग करण्यासाठी महिला मंडळी सरसावली आहे. या शुभकार्याची पाहणी मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, मंदिर कमिटीचे सेक्रेटरी अनंता देवकते, संचालक राजाराम झरेवाड, वामनराव बनसोडे, श्रीमती लताबाई पाध्ये, सौ लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, अनिल मादसवार, संजय माने, विलास वानखेडे, गजानन मुत्तलवाड, बाबूराव भोयर गुरुजी, यात्रा सब कमिटीचे सुभाष शिंदे, ज्ञानेश्वर शिंदे, विठ्ठलराव ठाकरे, दिलीप पार्डीकर, रामराम सूर्यवंशी, सौ. ज्योती पार्डीकर, सौ. सुनंदा दासेवार, सौ.रुघे बाई, सौ. चवरे बाई, सौ. देशपांडे बाई, रेखा डांगे, सौ जोगदंड, सौ.तिमापुरे बाई, सौ. बंडेवार, कोमावार, पेन्शनवार, मुद्रेवार, उत्कर्ष मादसवार, आदिंसह हिमायतनगर शहरातील शाळेत विद्यार्थ्यांनी व सर्व समित्यांची पदाधिकारी, महिला पुरुष, कर्मचारी व गावकरी परिश्रम घेत आहेत.
Related Articles
