मनपा सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत थकीत मालमत्ता करापोटी लोक अदालत मध्ये ७७ मालमत्ता धारकांनी शास्ती सुट वगळून ३७ लाख कर भरला

नवीन नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत एकुण वाटप केलेल्या थकीत मालमत्ता धारकापैकी केवळ ७७ मालमत्ता धारकांनी लोक अदालत मध्ये एकुण ३७ लाख १४ हजार ४५५ कर भरला असुन शास्ती योजना लाभ घेतला आहे.
मनपाच्या वतीने नांदेड येथील मुख्यालय येथे ,आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे,अतिरीक् आयुक्त गिरीश कदम यांच्या आदेशानुसार उपायुक्त अजितपाल संधु यांच्या मार्गदर्शनाखाली सिडको क्षेत्रीय कार्यालय सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक मारोती सारंग, प्रकाश दर्शने, संजय नागापूरकर, वसुली लिपीक मालु एनफळे,महेंद्र पटाडे, रमेश यशवंतकर, विवेकानंद लोखंडे, नथुराम चवरे, रविंद्र पवळे, सुधीर कांबळे, नरसिंग कुलकर्णी, दिपक जौधंळे, राहुल पाईकराव यांच्या मार्फत ५० हजार वरील जवळ पास ११९९ मालमत्ता धारकांना मालमत्ता करापोटी राष्ट्रीय लोक अदालत साठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण मार्फत नोटीस बजावण्यात आली होती, व राष्ट्रीय लोक अदालत मध्ये रक्कम भरल्यास ८० टक्के थकीत शास्ती वर सुट देणार असल्याची घोषणा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी केली होती.
२७ जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालत मध्ये सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत ७७ मालमत्ता धारकांनी३७ लाख १४ हजार रक्कम नगदी भरली असुन शास्ती सुट योजना लाभ घेतला आहे. थकबाकी मालमत्ता कर धारकांनी मालमत्ता कर भरून जप्ती टाळून सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे व सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांनी केले आहे.
