
हदगाव, शेख चांदपाशा। शहराच्या पुर्व दिशेला असलेल्या संभाजी नगर, दत्तबर्डी तांडा या वसाहतीतुन जाणाऱ्या हातोटी नाला असुन या नाल्याचे काम अर्धवट झाल्याने व त्या नाल्याचे योग्य पद्धतीने ने बांधकाम न झाल्याने नाल्यात नागरिकांचे सांडपाणी तिथेच साचत आहे या नाल्यावर स्लाँब न टाकल्यामुळे व नाल्याची सफाई न केल्यामुळे डास व रोगराई वाढत आहे.
हदगाव शहरातील नाल्याच थातुर मातुर काम कोण्यातरी नोदणीकृत कञाटदाराच्या नावे भलत्याच व्यक्तिने केल्याने या नाल्याचे बाधकाम योग्य रितीने झाले नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणने आहे. या बाबतीत जागरुक नागरिकांनी लेखी स्वरुपात प्रशासनाकडे तक्रारी केल्या आसल्या तरी या बाबतीत नेहमी प्रमाणे प्रशासानाने दखल घेतली नसल्याचे दिसुन येत आहे.
विशेष म्हणजे या पावसाळ्यात दत्तबर्डी [माळरान] पाण्याचा प्रवाह इतका तिव्र असतो की, त्या दृष्टीने नाल्याचे बांधकाम अपेक्षित होते. या बाबतीत माञ आलेल निधी कश्या प्रकारे खर्च करायचा हाच उद्देश कञाटदाराच्या नावे भलत्याच व्यक्तीने केल्यामुळे हे काम अर्धवट झाल्याने घाणपाणी कचरा झाडे झुडपे या नाल्यात उगवल्या मुळे डासांची उत्पती होत असुन, हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले असावे? असे दिसुन येते.
यामुळे रोगराई वाढत असून, परिसरातील छोटे बालकसह नागरिक वयोवृध्द नागरिकांची संख्या रुग्णालयात वाढतांना दिसुन येत आहे. सदरिल झालेल्या नाली बांधकामवर स्लाँब न टाकल्यामुळे नागरिकाच्या जिवितासधोका निर्माण झालेल आहे. पावसाळ्या आगोदरच नाल्याची साफसफाई होने आवश्यक असुन, या बाबतीत कञाटदाराच्या नावे भलत्याच व्यक्तीने थातुर मातुर काम करून पोळी भाजून घेतली आहे. अश्या प्रकारे अर्धवट कामे करणाऱ्या नोदणीकृता कञाटदारावर कारवाई होने आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणने आहे.
