नवीन नांदेड। विष्णुपुरी येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय येथे रूग्नांना औषधी तुटवडा भासू लागल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत नांदेड शहर युवक काँग्रेसकडून एक लाख २५ हजार रुपयाची औषधी दि.३आक्टोबर रोजी अधिष्ठाता शामराव वाकोडे यांच्या कडे युवक काँग्रेसकडून औषधी साठा सुपूर्द करण्यात आला.
विष्णुपरी येथील रुग्णालयात औषधी साठा अभावी रुग्णालयातील उपचारासाठी दाखल झालेल्या रूग्णांना मिळत नसल्याने बाहेरून विकत घ्यावे लागत होते, औषधी अभावी रूग्नांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी युवक काँग्रेसकडून विठ्ठल पावडे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक बांधिलकी जोपासत विष्णुपुरी येथील रूग्णालयात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण ,आमदार मोहनराव हंबर्डे यांच्या उपस्थितीत अधिष्ठाता वाकोडे यांच्याकडे औषधी साठा देण्यात आला.
यावेळी आ.शामसुंदर शिंदे,राहुल हंबर्डे जयसिंग हंबर्डे ,सतिश बसवदे, श्याम कोकाटे,संतोष जानापुरीकर, निखिल चौधरी,यांच्या सह संतोष पांडागळे, माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे,शिवराम लुटे,संतोष बारसे, जे.पी.पाटील,डॉ. करुणा जमदाडे, शिवप्रसाद कुबडे, पदाधिकारी उपस्थित होते.