
लोहा। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोह्याच्या सहायक पोलिस निरीक्षक श्री चन्ना , पोलीस उपनिरीक्षक हलसे यांनी बदली झाली .पीएसआय सुभाषराव निवळे हे इस्लापुर येथून बदली होऊन आले असून लोहा पोलीस ठाण्यात ते रुजू झाले आहेत.
पीएसआय निवळे इस्लापूर पोलीस ठाण्यात कार्यरत होते त्यापूर्वी त्यांनी बारड, ग्रामीण, मुदखेड, मुक्रमाबद, किनवट, या पोलीस ठाण्यात त्यांनी ड्युटी केली तसेच डीएसबी नांदेड येथे अनेक वर्षे त्यांनी काम केले आहे .कार्य तत्पर अधिकारी म्हणून त्याची ओळख असून सेवानिवृतिच्या उंबरठ्यावर आहेत जेथे ड्युटी केली तेथे त्यांनी चागले काम केले आहे.
पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी त्याचे स्वागत केले .सावरगाव येथील शिवनिकेतन शाळेतील शिक्षक अरविंद निवळे यांचे ते थोरले बंधू आहेत शिवछत्रपती विद्यालयाचे मुख्याध्यापक दमोधर वडजे, बालाजी गवाले, रमेश पिठलवाड, हरिहर धुतमल यांनी त्याचा सत्कार केला
सपोनि चन्ना यांनी बदली झाली आहे.
