क्राईमनांदेड

मायक्रो फायनान्सच्या विरोधात सीटूने बंड पुकारला,सामूहिक उपोषणाने सुरवात ; बैठक बोलावून तोडगा काढण्याचे निवासी उप जिल्हाधिकाऱ्यांचे आश्वासन

नांदेड। गरीब आणि गरजू महिलांना हेरून त्यांच्या आर्थिक अडचणीत हातभार लागावा म्हणून गट तयार करून नंतर गटातील इतर महिला मार्फत हफ्तेवारी रक्कम भरण्यास भाग पाडणे वेळ प्रसंगी कुठल्याही थराला जाणे, गटातील महिलांचा वेळोवेळी अवमान करणे ही मानसिकता मायक्रो फायनान्स कंपण्यांची झाली असून नारी शक्तिचा अवमान नित्याचाच झाला आहे.त्या मायक्रो फायनान्सच्या अमानुष कृती विरोधात सीटू कामगार संघटनेने नांदेड मध्ये बंड पुकारल्याचे समोर आले असून सुरवात सामूहिक उपोषणाने केली आहे.

सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने दि.१८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११:३० वाजता पासून गट पीडित महिलांचे सामूहिक उपोषण जिल्हाधिकारी कार्यालया समोर सुरु करण्यात आले होते.त्या उपोषणात कासारखेडा ता.जि.नांदेड येथील ३२ महिलांनी सहभागी होऊन आपल्या मागण्या केल्या आहेत.तसेच फायनान्स कंपनीच्या जाचाचा पाढा वाचून दाखविला आहे.

एकीकडे देशात कारपोरेट कंपण्याचे आणि अनेक भांडवलदार घराण्याचे हजारो करोड रुपये सरकाने माफ केले आहेत. राष्ट्रीयकृत बँकेतून हजारो करोड रुपये कर्ज उचलून इंग्लंड मध्ये पळून जाऊन स्थायिक होऊ पाहणाऱ्या बँक बुडव्यांना दिलासा दिला आहे.त्याच धरतीवर सरकारने अल्प कर्ज उचलून आपल्या अडचणी भागवीणाऱ्या गटा च्या महिलांना दिलासा द्यावा ही मागणी पुढे आली आहे.

सावकारी कर्ज देणाऱ्या सावकरा प्रमाणे मायक्रो फायनान्स कंपन्याकडे पैसे कुठून येतात, त्यांनी बँक बुडव्या प्रमाणे शासनाच्या राष्ट्रीयकृत बँकेतून पैसे उचलून आर्थिक दृष्ट्या मागास महिलांमध्ये पैसे वाटप करून जास्त व्याज दराने पैसे वसुली केलेत काय हे तपासावे आणि संबंधित मायक्रो फायनान्स कंपण्यांच्या आर्थिक व्यवहाराची चॊकशी करावी अशी मागणी देखील सीटूने शासनाकडे केली आहे.खाजगी तत्वावर नियुक्त केलेले

वसुली अधिकारी – कर्मचारी पीडित महिलांच्या घरी जाऊन गुंडा प्रमाणे चार ते पास तास बसून पैशासाठी तगादा लावत आहेत वेळ प्रसंगी मनामध्ये लज्जा निर्माण होईल आशा शब्दात बोलून पीडितांच्या आत्मसन्मानास ठेच पोहचवत आहेत असे देखील महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयात सांगितले. पूर्ण क्रय शक्तीचा वापर केला तरी महिन्याला चार ते पाच हजार रुपये कमविणाऱ्या महिलांना दरमहा दहा ते बारा हजार रुपये भरणा करायला लागतो अशी परिस्थिती असून ते ही रक्कम कशी भरू शकतात हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे अनेकांनी गावे सोडून अज्ञात ठिकाणी वास्तव्यास जाणे पसंद केले आहे.

गटातील महिलेच्या घरी एखाद्याचा मृत्यू जरी झाला तरी पैसे न चुकता हफ्त्याच्या दिवशी भरावेच लागतील असे फर्मान वसुली कर्मचाऱ्याकडून सोडण्यात येते असे भयावह वास्तव समोर आले आहे. हे सर्व कृत्य बेकायदेशीर असून यापुढे महिलांना नाहक त्रास देणाऱ्या कंपण्या विरुद्ध तसेच वसुली साठी तगादा लावणाऱ्या विरुद्ध फोजदारी गुन्हे दाखल करणार असल्याचे सीटू चे जनरल सेक्रेटरी तथा युनियन चे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालया मार्फत जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था,व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक आणि पोलीस अधीक्षक नांदेड आदींच्या नावे पत्र काढून उचित कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसे संघटनेचे अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड आणि कासारखेडा येथील स्थानिक अध्यक्ष कॉ.वर्षाताई इंगोले आणि सचिव कॉ.सोनाजी गायकवाड यांना लेखी कळविले आहे.

निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.महेश वडदकर यांनी लवकरच सर्व गट प्रमुखांची बैठक लावून योग्य तोडगा काढण्यात येईल असे आश्वासन दिल्यामुळे रात्री उशिरा साडे आठ वाजता सुरु केलेले सामूहिक उपोषण तात्पुरते स्थगित केल्याची घोषणा कॉ. गायकवाड यांनी केली. या आंदोलना मध्ये सीटूच्या राज्य सचिव तथा जिल्हा अध्यक्षा कॉ.उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, अ.भा.जनवादी महिला संघटनेच्या तालुका अध्यक्षा कॉ.लता गायकवाड, कॉ.सुभाषचंद्र गजभारे, कॉ. सोनाजी कांबळे,कविता खंडागळे,लता लांबटीळे,दैवशाला साबळे,मीना बराटे,ज्योती कळसे, सुरेखा गायकवाड, शोभाबाई जायभाये,लक्ष्मीबाई कोल्हे, सुजाता मुळे,दीपाली हिंगोले,रेखा नरवाडे आदींनी नेतृत्व केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जोपर्यंत बैठक होणार नाही तो पर्यंत कुणीही हफ्ते भरणार नाही असा संकल्प सीटू चे सभासद असणाऱ्या सर्व गट पीडितांनी केला असून जर कुणी बळजबरी केली तर त्या वसुली कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असे सर्वानुमते ठरविण्यात आले आहे. पुढील चार दिवसात साधारणतः वीस गट प्रमुख,जिल्हा आग्रनी बँक,जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पोलीस अधिकारी आणि संघटनेचे प्रतिनिधी तसेच गटा मध्ये असलेले पीडित सभासद उपस्थित राहणार आहेत.अशी माहिती कॉ. गंगाधर गायकवाड यांनी दिली आहे.जर कुणाला असा त्रास असेल तर त्यांनी सीटू संघटनेशी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!