नांदेड। रक्तपेढीच्या तपासणी अहवालात त्रुटी न काढण्यासाठी लाच मागणाऱ्या डॉ. अश्विनी किशनराव गोरे, वय 42 वर्षे, पद – वैदयकीय अधिकारी, उपजिल्हा रूग्णालय उदगीर, जि. लातुर अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक रक्त संक्रमण अधिकारी, (वर्ग -1), प्रादेशिक रक्त संक्रमण कार्यालय,धाराशिव, जि. धाराशिव, आणि डॉ. प्रितम तुकाराम राऊत, वय 48 वर्षे, (आरोपी क्र. 1 यांचे पती) पद – वैदयकीय अधिकारी, अस्थीरोग तज्ञ, (वर्ग -1), शासकीय वैदयकीय महाविद्यालय व रूग्णालय, धाराशिव, जि. धाराशिव. दोघे रा. क्वॉटर्स क्र.3, क्लास 1 क्वॉटर्स, सिव्हील हॉस्पिटल कॅम्पस, मारवाडी गल्ली, धाराशिव, जि. धाराशिव यांना 50 हजाराचं स्वीकारले प्रकरणी एसीबीने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तक्रारदार यांचे डॉक्टर लेन, नांदेड येथे अर्पण रक्तकेंद्र (रक्तपेढी) आहे. दि. 07/03/2024 रोजी यातील आरोपी डॉ. अश्विनी गोरे यांनी दुपारी एक वाजण्याचे सुमारास त्यांचे रक्त केंद्राला (रक्तपेढी) भेट देवून तपासणी केली. रक्त केंद्राची (रक्तपेढी) तपासणी झाल्यानंतर जातेवेळी दुपारी साडे चार वाजण्याचे सुमारास त्या तक्रारदार यांना म्हणाल्या की, रक्त केंद्राच्या (रक्तपेढी) तपासणीत त्रुटी न काढण्यासाठी रू. 1,10,000/- द्यावे लागतील, नाही तर तुमचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) कायमचे बंद करण्याची कारवाई केली जाईल. त्यावेळी तक्रारदार यांनी त्यांना आता सध्या पैसे नाहीत असे म्हणाले असता, आरोपी क्र. 1 यांनी आता जेवढे आहेत तेवढे द्या असे सांगितले. डॉ. अश्विनी गोरे यांना मागितलेली रक्कम नाही दिली तर ते तक्रारदार यांचे रक्तकेंद्र (रक्तपेढी) बंद करण्याची कारवाई करतील या भितीने तक्रारदार यांनी त्यांना रू. 10,000/- दिले. त्यानंतर आरोपी क्र. 1 यांनी उर्वरित रू. 1,00,000/- दि. 08/03/2024 रोजी दया, ते पैसे घेण्यासाठी मी माणूस पाठविते असे त्यांनी तक्रारदार यांना सांगितले.
सदरची रक्कम रु.1,00,000/- ही लाच असल्याचे तक्रारदार यांना खात्री झाल्याने, त्यांना ती देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड येथे तक्रार दिली. त्यावरून आज दि. 08/03/2024 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पथकाने तक्रारदार यांना लाच मागणी पडताळणीसाठी आरोपी लोकसेविका डॉ. अश्विनी गोरे यांचे मोबाईलवर पंचासमक्ष कॉल लावला असता, डॉ. अश्विनी गोरे यांनी कॉल उचलला नाही. लगेच तक्रारदार यांना एक कॉल आला व त्याने सांगितले की, मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी तुम्हाला भेटण्यास सांगितले आहे, तुम्ही पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर या असे सांगितले.
त्याप्रमाणे तक्रारदार यांना पंचासह पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पडताळणीसाठी पाठविले असता, त्याठिकाणी एक इसम आला व त्याने मला डॉ. अश्विनी गोरे मॅडम यांनी पाठविले आहे असे सांगितले. तेव्हा तक्रारदार यांनी डॉ. अश्विनी गोरे यांना खात्री करण्यासाठी पंचासमक्ष मोबाईलवर कॉल केला असता, त्यांनी तक्रारदार यांना डॉ. अश्विनी गोरे यांनी तेथे माळी आलेले आहेत. आणले का, किती आणले, त्यांना द्या, असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी रू. 50,000/- आणलेले आहेत असे सांगितले असता, आलोसे डॉ. अश्विनी गोरे यांनी तुम्ही दिलेला शब्द पाळा, ठरल्याप्रमाणे दया असे म्हणाल्या. तेव्हा तक्रारदार यांनी आज सुट्टीचा दिवस आहे. पैसे जमवाजमव करायला वेळ लागेल असे सांगितले. डॉ. अश्विनी गोरे यांनी ठिक आहे, माझे माणसाकडे दया असे म्हणून फोन कट केला.
त्यामुळे तक्रारदार यांनी आरोपी क्र. 2 डॉ. प्रितम राऊत यांना पैसे घेवून येतो असे म्हणून परत आले. त्यानंतर तक्रारदार यांनी आरोपी क्र. 2 यांची पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड समोर पंचासमक्ष भेट घेतली असता. आरोपी क्र. 2 डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांनी तक्रारदार यांच्याकडून पंचासमक्ष सदरची लाच रक्कम रू. 50,000/- स्विकारली. तक्रारदार यांनी तात्काळ इशारा दिल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड च्या पथकाने आरोपी क्र. 2 यास रंगेहाथ पकडले. आणि आरोपी लोकसेवक डॉ. प्रितम तुकाराम राऊत यांना ताब्यात घेण्यात आले असुन पो.स्टे. वजीराबाद, जि. नांदेड येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असुन पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नांदेड हे करीत आहेत.
सदरची कारवाई डॉ. राजकुमार शिंदे, (भा.पो.से.) पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड परिक्षेत्र,नांदेड मोबाईल क्र. 9623999944 पर्यवेक्षण अधिकारी श्री राजेंद्र पाटील,
पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो,नांदेड मोबाईल क्र. 7350197197. सापळा कारवाई पथक* – श्री गजानन बोडके, पोलीस निरीक्षक, पोना/राजेश राठोड, पोकॉ/स.खदीर, पोकॉ/बालाजी मेकाले,पोकॉ/अरशद खान, चापोना/प्रकाश मामुलवार, अँटी करप्शन ब्युरो,नांदेड यांनी तपास अधिकारी श्री गजानन बोडके, पोलीस निरीक्षक,अँटी करप्शन ब्युरो, नांदेड.
या कार्यवाही नंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन केले की त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम, एजेंट यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, दुरध्वनी क्रमांक 02462253512 टोल फ्रि क्रं.1064 यांचेवर संपर्क साधावा