अण्णाभाऊ साठे जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत तिन मिरवणूक, अनेक भागात कार्यक्रम..

नवीन नांदेड l अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बळीरामपुर, धनेगाव, सुनिल नगर , या ठिकाणी मिरवणूक तर अनेक भागात व ग्रामीण भागातील गावात जयंती निमित्ताने ध्वजारोहण सह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.
१ ऑगस्ट रोजी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील बळीरामपुर भागात तिन तर धनेगाव गावात एक व इतर गावात विविध ठिकाणी जयंती निमित्ताने कार्यक्रम आयोजित केले असून जयंती निमित्ताने ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वाघाळा येथील साठे नगर भागात नवयुवक जयंती मंडळ यांच्या वतीने अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने सकाळी माजी नगरसेविका सौ. बेबी ताई जनार्दन गुपीले यांच्या हस्ते ध्वजारोहण तर प्रमुख पाहुणे ऊधोजक माधव डोंम्पले, संजय गायकवाड यांच्या सह समाज बांधव पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
सिडको परिसरातील अण्णा भाऊ साठे सभागृह येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्ताने १ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता अण्णा भाऊ साठे यांना अभिवादन व ध्वजारोहण सिडको नवीन नांदेडचे प्रशासक भुजंगराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
सिडको अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जयंती महोत्सव पदाधिकारी व समाज बांधव यांच्या वतीने १ ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृह येथे अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात विविध कार्यक्रम व अभिवादन आयोजित करण्यात आले असून आजी माजी लोकप्रतिनिधी, दलित मित्र,जेष्ठ समाज बांधव, यांच्या सह महिला, युवक, हे उपस्थित राहणार असून अभिवादन सोहळ्याला जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सार्वजनिक जयंती मंडळ पदाधिकारी व समाज बांधवांनी केली आहे.
