उस्माननगर। सामाजिक क्रांतीचे प्रणेते ,भारत देशातील थोर संत , राजगुरू ,संत शिरोमणी रोहिदास ( रविदास ) महाराज यांची ६४७ वी जयंती बस स्टॉपवरील राज बुट वेअर येथे उत्साहात साजरी करून उपस्थितांना खिचडीचे वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील सरपंच सौ शोभाबाई शेषेराव काळम ह्या होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच शेख बाशिद भाई , शिवहार स्वामी महाराज मठपती,संजय वारकड( चेअरमन )प्रा.विजय भिसे ( भिमाशंकर मा.विद्यालय शिराढोण ) राहुल सोनसळे ( मुख्याध्यापक तथा माजी उपसरपंच ) , अनिरुद्ध सिरसाळकर ,शिवशंकर कांबळे ( भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा अध्यक्ष ,)आमिन आदमनकर, आमिनशहा फकीर , गणेश लोखंडे , रशिद खान पठाण , लक्ष्मण भिसे , राजेश मोरे , सखाराम सोनटक्के ,गंगाधर कांबळे , गोविंद भिसे , गंगाधर भिसे , नारायण हाराळे ,आदीची उपस्थिती होती.

यावेळी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या ६४७ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रम दरम्यान प्रतिमेचे पूजन, व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.त्यानंतर राजू सोनटक्के , प्रा.विजय भिसे , गणेश लोखंडे यांनी संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले.आपल्या मनोगतातून महापुरुषांना डोक्यावर घेऊन न नाचत त्यांचे विचार डोक्यात घालून त्यांची जयंती साजरी केल्याचे समाधान मिळेल.आजच्या तरूणांनी महापुरुषाचा आदर्श घ्यावा असे आवाहन यावेळी करण्यात आले. त्यानंतर उपस्थित समुदयांना खिचडीचे वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन रामदास सोनटक्के यांनी केले तर.आभार सामाजिक कार्यकर्ते व्यंकटी सोनटक्के यांनी मानले.बालाजी गाडेकर , व्यंकटी सोनटक्के , रामदास सोनटक्के ,बाळू सोनटक्के , राजाराम ( राजू ) सोनटक्के ,लक्ष्मण सोनटक्के ,नागेश सोनटक्के , नारायण वाघमारे ,अदी मित्रांनी परिश्रम घेतले. पत्रकार सभागृहात व ग्रामपंचायत कार्यालयात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांना अभिवादन उस्माननगर येथील आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात संत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार संघाच्यावतीने प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी पत्रकार , सरपंच ,उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रमुख पाहुणे, प्रतिष्ठित नागरिक ,मोठ्या संख्येने उपस्थित होते. सम्राट अशोक प्राथमिक शाळा , समता मा. व उच्च माध्यमिक विद्यालय , प्राथमिक आरोग्य केंद्र दवाखान्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गोविंद बोदेमवाड , पवणेकर , सोनवणे , लोंढे , तसेच मुख्याध्यापक राहुल सोनसळे , मन्मथ केसे, भगवान राक्षसमारे, देविदास डांगे, सर्व शिक्षकवृंद शिक्षकेत्तर कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी डॉ.किरण दुलेवाड , डॉ.प्र.लोणे ,सह दवाखान्यातील कर्मचारी उपस्थित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version