उस्माननगर। वंचित बहुजन युवकांचे आयकाॅन ,युवा नेते ,महामानवांची चौथी पिढी , बाळासाहेब यांचे सुपुत्र लाखो युवकांचे प्रेरणास्थान युवा नेतृत्व युवराज सुजात प्रकाश आंबेडकर यांचे उस्माननगर चौकात दुपारी दोन वाजता नागवंशी मित्र मंडळ व उस्माननगर परिसरातील भीमसैनिकांनी फटाक्यांची आतिषबाजी करून जंगी स्वागत केले.
गुरूवारी दुपारी कंधार,लोहा येथे आयोजित निर्धार मेळाव्याला युवराज सुजात आंबेडकर हे मोटर सायकल रॅली द्वारे लोहा येथे वंचित बहुजन आघाडीच्या नांदेड जिल्हा दक्षिण आयोजित निर्धार मिळण्यासाठी जात असताना वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांचे जागोजागी जंगी स्वागत झाले.
नांदेड हून सिडको ,किवळा , लोढेसांगवी , उस्माननगर,या राष्ट्रीय महामार्गावरील गावा गावातील भीमसैनिकांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.यावेळी उस्माननगर,शिराढोण ,कापसी येथील भीमसैनिकांनी स्वागतासाठी गर्दी केली होती.याप्रसंगी ढोल ताशा व फटाक्यांची आतिषबाजी करून भव्य दिव्य स्वागत करुन परिसर घोषणाबाजी ने नाहून गेले होते.
यावेळी ज्येष्ठ भीमसैनिक तथा माजी उपसरपंच देवरावजी सोनसळे , किशनराव कांबळे , गंगाधर कांबळे ,राहुल सोनसळे ,अंगुलिकुमार सोनसळे , अंकुश कांबळे ,धम्मानंद कांबळे , चांदोबा लोकडे पेनुरकर , यांच्यासह महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.