नांदेड| अत्यंत अटीतटीची ठरलेली डॉ.शंकरराव चव्हाण शारदा धनवर्धिनी शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रवक्ते संतोष पांडागळे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढविणाऱ्या समता पॅनलने घवघवीत यश संपादन केले असून 15 पैकी 12 जागांवर त्यांनी विजय मिळविला आहे.या विजयी उमेदवारांमध्ये सर्वाधिक मते घेणाऱ्या संतोष पांडागळे यांचा समावेश आहे.

श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटीअंतर्गत असलेल्या माध्यमिक शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था असून या पतसंस्थेची निवडणूक या खेपेस मोठी अटीतटीची झाली. प्रारंभीच चार उमेदवार बिनविरोध निवडून आले होते. त्यामध्ये समता पॅनलच्या तीन उमदेवारांचा समावेश होता. उर्वरित 11 जागेसाठी आज दि. 29 रोजी सकाळी 8 ते 3 या वेळात मतदान घेण्यात आले. मतदान शंभर टक्के झाले.त्यानंतर लगेच मतमोजणी झाली.

सर्वसाधारण गटातील 9 जागांमध्ये संतोष पांडागळे यांनी सर्वाधिक 112 मते घेतली. त्यांच्या पाठोपाठ पतसंस्थेचे विद्यमान सचिव गंगाधर जाधव यांना 111 तर प्रशांत पाटील धानोरकर यांना 110, विलास शिंदे 109, सचिन पाटील 109, महेश मुत्तेपवार 97, विलास देवसरकर 88 यांनी विजय मिळवला. तर ओबीसी प्रवर्गातून निवडणूक लढविणाऱ्या नागेश बोचकरी यांनी प्रतिस्पर्ध्यावर मोठ्यामतांनी मात केली. त्यांना 124 मते मिळविली.शिक्षकेत्तर कर्मचारी गटातील शंकर घाटोळ यांनी 119 मते मिळवून घवघवीत यश संपादन केले. बिनविरोध आलेंल्यामध्ये महिला गटातून माजी नगरसेविका कविता संतोष मुळे (कोथळकर), एन.टी.प्रवर्गातून हिरामण साखरे तर एस.सी.प्रवर्गातून संजय डोईबळे यांचा समावेश आहे.

विजयी उमेदवारांचे राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण, संस्थेच्या उपाध्यक्षा माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण, संस्थेचे सचिव तथा माजी पालकमंत्री डी.पी.सावंत, सहसचिव डॉ.रावसाहेब शेंदारकर, कोषाध्यक्ष ॲड.उदय निंबाळकर, महात्मा फुले हायस्कूल बाबानगरच्या मुख्याध्यापिका सौ.एस.आर.कदम, सावित्रीबाई फुले शाळेचे मुख्याध्यापक मारोतराव कल्याणकर, इंदिरा गांधी हायस्कूल सिडकोचे मुख्याध्यापक बालासाहेब शिंदे, भाऊराव चव्हाण माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक व्ही.एल.गोविंदवाड यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version