नवीन नांदेड| खासदार धीरज साहु यांच्या कडे सापडलेल्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी भाजपा महिला मोर्चा सिडको मंडळ कडून दि. ११ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या प्रतिकात्मक पुतळ्यास जोडो मार आंदोलन करून सिडको येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ दहन करण्यात आले.
राहूल गांधी यांच्या अत्यंत निकटचे असलेले काँग्रेस पक्षाचे झारखंडचे भ्रष्टाचारी खासदार धीरज साहू यांच्या घरामध्ये 318 कोटी रूपये सापडले. सदरील भ्रष्टाचारी खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेमध्ये सतत त्यांच्या संपर्कात व सोबत होता वारंवार भारतीय जनता पार्टी व पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्यावर टीका करणाऱ्या काँग्रेसचा भ्रष्टाचारी चेहरा याच धीरज शाहू यांच्या रूपाने उघड झाला आहे. भाजप व नरेंद्र मोदी हे विरोधी पक्षांवर मुद्दामून ईडी तसेच इतर तपास यंत्रणांचा ससेमीरा पाठीमागं लावत असल्याचा आरोप काँग्रेसकडून वारंवार करण्यात येतो. परंतु राहुल गांधी यांच्या अत्यंत जवळचा खासदार असलेल्या धीरज साहू याच्या घरामध्ये काळ्या पैशाची खाणच सापडली आहे.आतापर्यंत जवळपास 350 कोटी रुपये नगदी स्वरूपात मिळाले असून अजूनही काही खोल्या तपासायच्या आहेत.
चोराच्या उलट्या बोंबा याप्रमाणे काँग्रेस पक्ष वागत असून संपूर्ण काँग्रेस पक्षच भ्रष्टाचारी असल्यानचे मागील काळामध्ये मोठमोठे घोटाळे या काँग्रेस पक्षाने केलेले असल्याने सिद्ध होते. अशा भ्रष्टाचारी काँग्रेस खासदाराचा निषेध भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ,लोकसभा महिला समन्वयक प्रणिताताई चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजपा महानगर अध्यक्ष मा.दिलीप भाऊ कंदकुर्ते,सरचिटणीस डॉ. शितलताई भालके , महिला महानगराध्यक्ष श्रद्धाताई चव्हाण यांच्या नेतृत्वातभारतीय जनता पार्टी सिडको मंडळ महिला मोर्चाच्या वतीने सिडको येथे जोडे मारो आंदोलन करून करण्यात आला.
यावेळी भाजपा वाघाळा शहर मंडळ अध्यक्ष सचिन रावका ,संतोषजी वर्मा,वैजनाथ देशमुख,नवनाथ कांबळे,शिवानंद निल्लावार, प्रतिभा वाघमारे,नरेद्र बैस, चंचलसिह जाट, राजन जोजारे,विशवनाथ जटाळे, भालचंद्र मोकले,महेद्र तरटे,विठल घाटे,बालाजी मोरे,जनार्दन गुपीले,चंद्रकांत बंडावार,निरज चव्हाण, प्रभुराज मठपती,प्रमोद रेवणवार,विनय बोगदरे,भुंंजगराव मोरे, संतोष जाधव, ओमप्रकाश शिरेवार,अनिल लोखंडे, सिडको महिला मोर्चा मंडळ अध्यक्ष विजया गोडघासे, महिला मोर्चा सरचिटणीस सूषमा ठाकूर, माजी नगरसेविका बेबीताई गुपीले,सुंनदा फड, माया जाधव, निर्मला शिवसागर, संगिता देशमुख, पारवती पदमणे,सुनिता ठाकूर संजय गिरी, ज्ञानोबा गिरडे,यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.