नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून आगामी काळात रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीतून प्रत्येक समाजघटकांतील लोकांच्या स्वावलंबनासाठी आम्ही यापूढेही कर्तव्यतत्पर असल्याची ग्वाही राष्ट्रवादीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.पुजाताई जेधे यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्षा सौ.पुजाताई जेधे ह्या आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर आल्या होत्या.त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील पक्षाच्या शहर जिल्हा संपर्क कार्यालयात,डॉ.लाईन परिसरात आयोजित बैठकीत त्या मार्गदर्शनपर बोलत होत्या.
या बैठकीचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक राष्ट्रवादीचे शहर जिल्हा सरचिटणीस गणेशअण्णा तादलापूरकर यांनी तर,उपस्थितांचे आभार शफी उर रहेमान यांनी मानले. यावेळी पूढे बोलतांना सौ.पुजाताई जेधे म्हणाल्या की, राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष व माजी केंद्रीय कृषीमंत्री खा.शरदचंद्र पवार हे समाजकारणातून राजकीय वाटचाल करीत प्रत्येक समाजघटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सदैव कर्तव्यतत्पर असतात हे सर्वश्रुत आहेच त्यांचा समर्थ वारसा चालवित खा.सुप्रियाताई सुळे ह्या प्रत्येक समाजघटकांसह मुख्यत्वे महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी अहोरात्र कार्यरत असून पक्षपातळीवर रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदावर नियुक्तीनंतर राज्यभरात आपण दौरे करीत आहोत व पक्ष पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेंची मते जाणून घेत आहोत सद्यास्थितीत प्रत्येकांना रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीतून स्वावलंबी होणे अत्यावश्यक असल्यानेच आगामी काळात पक्षाच्या या विभागाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना किमान कौशल्यावर आधारित तसेच,यासह युवती व महिलांना विविध प्रकारचे गृह वा अन्य उद्योगांचे प्रशिक्षण त्यानंतर, निवडलेल्या उद्योगासाठीचा कच्चा माल वा तयार माल विक्री-खरेदी आदी सर्वच बाबींचे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रवादीच्या महिला शहर जिल्हाध्यक्षा सौ.सिंधुताई देशमुख,तातेराव पाटील आलेगांवकर,शहर जिल्हा उपाध्यक्ष बंटी लांडगे,युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी,विद्यार्थीचे शहर जिल्हाध्यक्ष फैजल सिद्दीकी, युवतीच्या महुमदी पटेल,
राष्ट्रवादीच्या किसान सभेचे मा.प्रदेश प्रतिनिधी लक्ष्मणराव भवरे,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर,पंजाबराव सुर्यवंशी, गंगाधर कवाळे,गंगाधर महाजन,युनुसखान,नाना पोहरे, नितीन मामडी,सामाजिक न्याय विभागाचे अमित कांबळे,वक्ता व प्रशिक्षण विभागाचे एकनाथ वाघमारे,शिख सेलच्या परमजीत कौर,साजीदा बेगम आदींसह स्थानिक पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. या बैठकीत राष्ट्रवादीच्या रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या शहराध्यक्षपदी श्रीमती कमलताई लांडगे यांची नियुक्ती करण्यात येऊन त्यांना तसे,प्रदेशाध्यक्ष सौ.पुजाताई जेधे व पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ.सुनील कदम यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.