नांदेड| उमरी आणि अर्धापूर तालुक्यात काँग्रेस पक्षाला खिंडार पडले असून राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खा.अशोकराव चव्हाण यांच्या यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून उमरी तालुक्यातील सावरगाव, महाटी, बोळसा, कौडगाव, वाघलवाडा यासह १४ आणि अर्धापूर तालुक्यातील ०३ अशा एकूण 17 गावांमधील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा भाजप प्रवेश सोहळा आज सोमवारी ( दि.१८ ) आयटीएम येथे उत्साहात पार पडला.
याप्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकराव चव्हाण यांच्यासह आ.राजेश पवार, माजी आ. अमरनाथ राजूरकर, माजी सभापती किशोर स्वामी, भाऊराव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव तिडके,माजी जि.प.सदस्य प्रविण पाटील चिखलीकर, मारोती पाटील शंखतीर्थकर, बापूसाहेब बोरगावकर, शंकर पाटील सावरगावकर, ज्ञानेश्वर पाटील सावंत,प्रा. मनोहर पवार, व्यंकटराव मामा कल्याणकर, भगवान दंडवे आदिंची उपस्थिती होती.
यावेळी उमरी तालुक्यातील सावरगाव येथील दिपक पाटील पंढरे यांच्यासह 10 जण,महाटी येथील बळवंत सोपानराव मोरे 10, बोळसा येथील बबनराव शिंदे यांच्यासह 10, कौडगाव येथील बापूसाहेब येताळे यांच्यासह 30 ,वाघलवाडा येथील शेख जाकीर यांच्यासह 5, बीजेगाव येथील गणपतराव हंबर्डे यांच्यासह 10,हस्सा येथील देवराव पाटील हस्सेगावकर यांच्यासह 30, नागठाणा येथील साहेबराव लिंगाडे यांच्यास 10, चिंचाळा येथील विजयकुमार शिंदे यांच्यासह 5,मेंडका येथील दत्ता जाधव यांच्यासह 8, गोळेगाव येथील रमेश सावंत यांच्यासह 14, मालेगाव ता.अर्धापूर येथील बालाजीराव मरकुंटे, आणि अर्धापूर तालुक्यातील सांगवी खु. येथील रामा कल्याणकर यांच्यासह 8, खडकी येथील पुंडलिक बोराटे यांच्यासह 36 आणि कोंढा येथील रामराव कदम यांच्यासह 16 जणांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी उपरणे पांघरुन वरील सर्वांचे भाजपमध्ये स्वागत केले.