
उस्माननगर। महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून चौकी धर्मापुरी ता.कंधार येथील ग्रामरोजगार सेवक या पदावर काम करीत असणारे ग्राम रोजगार सेवक संतोष बालाजी कळकेकर ( वय ३५ वर्ष ) यांना मानधन मिळत नसल्याने आणि दैनंदिन कौटुंबिक गरजा भागविण्याच्या अनेक अडचणी येत असल्याने आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत सोशल मीडियावर मिळालेल्या माहितीनुसार कळका ता कंधार जी नांदेड येथील ग्रामरोजगार सेवक संतोष कळकेकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. कारण गेल्या सहा ते सात महिन्यापासून महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे काम केलेले आहे. परंतु त्याचा होणारा वितरित निधी आणि मानधन पंचायत समितीने वेळेवर न काढल्याने चालू जमान्यामध्ये आणि महागाईच्या वातावरणात दैनंदिन घरातील आर्थिक अडचणींना सामोरे जाता जाता आणि बँकेच्या कर्जला अखेर या संकटांना कंटाळून ग्राम रोजगार सेवक कळकेकर यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडल्याने नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी शासनाने घ्यावी आणि चांगल्या प्रकारे आर्थिक मदत करून त्या कुटुंबाला आर्थिक आधार द्यावा अशी मागणी महाराष्ट्रातील ग्राम रोजगार सेवक संघटना आणि कर्मचाऱ्याकडून केली जात.
