ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको व ग्रामीण भागात श्री चे विसर्जन शांततेत
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको जुना कौठा,वसरणी,वाघाळा,असदवन, असरजन या शहरी भागातील व ग्रामीण परिसरातील अनेक गावातील श्री विसर्जन शांततेत झाले तर शहरी भागातील मोठया श्री मुर्ती नानकसर झरी येथे मनपा व पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने क्रेनचा सहाय्याने तर मनपा प्रशासनाने नदीकाठावर श्री भक्ताकंडुन मुर्ती संकलन करण्यात आला, सिडको परिसरातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणूक मध्ये बळी रामपुर येथील जय व्यंकटेश, जय महाराष्ट्र यांच्या देखावा ने भाविक भक्तांचे लक्ष्य वेधून घेतले, सिडको परिसरातील जवळपास ५९ गणेश मंडळांनी तर ग्रामीण भागातील ११० गणेश मंडळाचे विसर्जन शांततेत झाले.
२८ सप्टेंबर अनंत चतुर्दशी निमित्ताने सिडको हडको परिसरातून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भव्य दिव्य मिरवणूक आयोजित करण्यात आली होती, रस्त्याच्या दुतर्फा विविध प्रतिष्ठान यांच्या वतीने अल्लपोहार, विविध पदार्थ वाटप करण्यात आले, यात महाराजा ईलेक्ट्रॉनिक,वैष्णवी रेडिमेड, श्री मेडिकल नांदेड,गंगा टेलर, चंबलवार किराणा,यांच्या सह अनेक प्रतिष्ठान यांच्या सहभाग होता,हडको परिसरातून निघालेल्या भव्य दिव्य मिरवणूक मध्ये ढोल ताशांच्या गजरात,मिरवणूक निघाली, यात ओकांर ,महाराणा प्रताप, युवा शक्ती, श्री छत्रपती, न्यू राजस्थानी, शक्ती गणेश मंडळ यांच्या सह सार्वजनिक गणेश मंडळ,शिव पुत्र गणेश मंडळ ,श्रीराम गणेश ,नरसिंह बाल गणेश श्री महाकाल गणेश मंडळ, श्री स्वामी विवेकानंद गणेश मंडळ शिव गणेश ,वाघाळा,गोपाळचावडी,बळीरामपुर, व परिसरातील ५९ गणेश मंडळ यांच्या सहभाग होता.
गणेशोत्सव मिरवणूक साठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिल कुमार नाईक,यांच्या आदेशानुसार ग्रामीण पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, सचिन गढवे,पोलीस उपनिरीक्षक आंनद बिचेवार,महेश कोरे, पोलीस अमलंदार,महिला पोलीस कर्मचारी, प्रशिक्षणार्थी कर्मचारी, होमगार्ड व कांकाडी येथील युवा अँकाडमीचा युवक यांच्या सह जवळपास तिनशे जणांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता, परिसरातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, यांच्यी उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती. भव्य मिरवणूक पाहण्यासाठी दुतर्फा सिडको हडको परिसरातील महिला युवक नागरिक यांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती.
सकाळपासूनच मनपा प्रशासन यांच्या वतीने मुर्ती संकलन सिडको क्षेत्रीय कार्यालय व नाव घाट वसरणी, जुना कौठा, साईबाबा मंदीर येथे मुर्ती संकलन करण्यात आले होते, या ठिकाणी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालय अधिक्षक विलास गजभारे, कर निरीक्षक दिपक पाटील, सुधीर बैस, स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे, अर्जुन बागडी, वसुली लिपीक, कार्यालयीन कर्मचारी यांनी संकलन केले होते.
सिडको हडको परिसरातील अनेक गणेश मंडळ यांनी सकाळपासून विधीवत पुजा करून गणेश मुर्ती नानकसर झरी येथे विसर्जन केले. विना डिजे पारंपरिक वाधवृंद, ढोल ताशांच्या गजरात गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या घोषणा नी निरोप देण्यात आला. जवळपास दिवसभर चालेली मुख्य मिरवणूक रात्री उशिरापर्यंत चालू होती.