सिडको मनपा क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान अंतर्गत कौठा भागातील म्हाडा वसाहती अंतर्गत साफसफाई…
नवीन नांदेडl स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ मधील कौठा म्हाडा वसाहती मध्ये सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान राबविण्यात आले होते,यावेळी सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड, स्वच्छता निरीक्षक, वसुली लिपीक यांच्या सह स्वच्छता महिला पुरुष मोठया संख्येने उपस्थित होते.
स्वच्छता भारतीय अभियान ना. २.०. अंतर्गत १ जुलै ते ३१ऑगस्ट २४ दरम्यान सफाई अपनाओ बिमारी भगाओ अभियान नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ. महेश कुमार डोईफोडे,यांच्या आदेशानुसार उपायुक्त दिवेकर कारभारी ,स्वच्छता विभाग सहाय्यक आयुक्त गुलाम सादेक, स्वच्छता विभाग प्रमुख वसीम तडवी,यांच्या मार्गदर्शना खाली सहा क्षेत्रीय कार्यालय येथे राबविण्यात येत आहे.
या विशेष अभियान अंतर्गत परिसरातील नाले साफ सफाई,कचरा संकलन करणार असुन सिडको क्षेत्रीय कार्यालय येथे ५ जुलै रोजी हडको परिसरातील इंदिरा गांधी हायस्कूल येथे तर सहाय्यक आयुक्त संभाजी कास्टेवाड,
स्वच्छता निरीक्षक किशन वाघमारे,अर्जुन बागडी,
वसुली लिपीक मारोती सारंग,मालु एनफळे,व महिला पुरूष यांनी जुना कौठा म्हाडा वसाहती अंतर्गत असलेल्या अनेक भागात स्वच्छता मोहीम राबवली. या मोहिमेत नागरीक व युवक संबंधित ठिकाणी सहभाग घेतला होता या वेळी परिसरातील कचरा मोठया प्रमाणात संकलन करण्यात आला.