करियरनांदेड

बोरगडी येथील नवनियुक्त उपविभागीय अधिकारी योगेश काईतवाड यांचा जंगी स्वागत

हिमायतनगर| नुकत्याच जाहीर झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेच्या निकालानंतर नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील मौजे बोरगडी येथील युवक योगेश दत्ता काईतवाड यांची उपविभागीय अधिकारी पदी निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर हिमायतनगर शहरात आज आगमन होताच ढोल ताश्याच्या गजरात जंगी स्वागत हिमायतनगर व बोरगडी वासियांच्या वतीने करण्यात आले. यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमेटिकडून नवनियुक्त उपविभागीय अधिकारी योगेश दत्ता काईतवाड यांचं स्वागत सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

निवडीनंतर पहिल्यांदाच हिमायतनगर शहरात आल्यानंतर नवनिर्वाचित उपविभागीय अधिकारी योगेश काईतवाड यांचं ढोल ताश्याच्या गजरात भव्य स्वागत करण्यात येऊन मिरवणूक काढण्यात आली. तसेच फेटा शाल व पुष्पहाराने उपस्थितांनी निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, संचालक अनिल मादसवार, संजय माने, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अक्कलवाड गुरुवारी, जेष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, गोपाळ महाराज मुरझलेकर, डॉक्टर दामोदर राठोड, सामाजिक कार्यकर्ते सुभाष शिल्लेवाड, सेवानिवृत्त लाईनमन तुकाराम मेरगेवाड, गोविंद बंडेवार, संजय पेन्शनवार, अशोक अनगुलवार, विठ्ठल देशमवाड, श्याम जक्कलवाड, उदय देशपांडे, पवन करेवाड, अशोक सिंगणवाड, विठ्ठल फुलके, राम नरवाडे, पापा पार्डीकर, गंगाधर बासेवाड, धर्मपुरी गुंडेवार, आदिंसह, हिमायतनगर, बोरगडी, अंदेगाव, धानोरा, वारंगटाकळी सीरंजनी, व तालुक्यातील अनेक नागरिक उपस्थित होते,

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!