
नांदेड| आमच्या जनावरांच्या गाड्या तुम्ही का पकडता असं म्हणून नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील कसायांनी गोरक्षक किरण सुभाष बिच्चवार, नांदेड विभाग गोरक्ष प्रमुख, विश्व हिंदू परिषद आणि राहुल कारमोड जिल्हा सहगोरक्षा प्रमुख यांना दिनांक 26 जून 2023 रोजी सायंकाळी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर कॉम्प्लेक्स येथील त्यांच्या दुकानात येऊन शेख जावेद शेख नबी साहेब याने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याविरुद्ध हिमायतनगर पोलीस स्टेशन येथे गुरनं. 467/2023 दिनांक 27/12/2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख , किरण बिच्चेवार यांनी मा. जिल्हाधिकारी साहेब ,मा. पोलीस महानिरीक्षक साहेब, मा. पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदनाद्वारे हिमायतनगर येथील काही कसाई सातत्याने त्यांच्या मागावर असल्याचे आणि वारंवार पाठलाग करत असल्याचे म्हटले आहे. हिमायतनगर येथील कसाई अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब, शेख एजाज इस्माईल कुरेशी आणि इतर त्यांना मारण्याचा कट करत असल्याबद्दल हे निवेदन देण्यात आलेले आहे. या निवेदनामध्ये दिनांक 27/12/2012 रोजी देखील एका गोवंशाच्या कारवाई दरम्यान वरील कसाई व इतर समाजकंटकांनी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला आणि नंतर हिमायतनगर पोलीस स्टेशनवर दगडफेक केली होती. तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी लाठीचार्ज केल्यावर वातावरण शांत झाल्याचे सुद्धा नमुद केले आहे.
त्यानंतर दिनांक 16/4 /2016 रोजी वाशी येथे कारवाई करून जप्त गोवंश पोलीस स्टेशन हिमायतनगरला घेऊन येत असताना अब्दुल हमीद अब्दुल कादर आणि शेख इलियास शेख नबीसाब व शेख एजाज इस्माईल कुरेशी यांनी बेकायदेशीर जमाव जमवून सदरील वाहनातील गोवंश उतरून त्या ठिकाणी म्हैस वर्गीय जनावर गाडीमध्ये भरले आणि जमलेल्या जमावास बिच्चेवार यांच्याविरुद्ध भडकवून जिवे मारण्याचा कट केला होता असेही म्हटले आहे.
तसेच दिनांक 29/09/ 2016 रोजी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री संदीप डोईफोडे यांना दोन वाहनांची माहिती दिली होती. तरीही सदरील वाहन पोलिसांनी न पकडता हिमायतगरच्या दिशेने निघालेले होते, तेव्हा पोलीस गाडी येईपर्यंत सरसम आबादी येथे बिच्चेवार यांनी संबंधित वाहन थांबून ठेवले होते. त्यावेळी देखील अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब व शेख एजाज इस्माईल कुरेशी आणि इतर पाच सात लोकांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी देऊन गोवंशासह वाहन घेऊन पसार झालेले या निवेदनात म्हटले आहे.
दिनांक 01 फेब्रुवारी 2023 रोजी शिवनी परिसरात दोन वाहनातून ज्यापैकी एका वाहनावर यापूर्वी तीन गुन्हे दाखल होते हे लक्षात आणून दिल्यानंतर सुद्धा सहायक पोलीस निरीक्षक श्री शेवाळे साहेब यांनी त्याकडे दुर्लक्ष करून हिमायतनगर येथील शेख एजाज इस्माईल कुरेशी यांनी घेतलेले तीन गोवंश आणि दोन वाहन याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केलेली होती. त्यावेळी कारवाई करण्यास टाळाटाळ केली होती याउलट आमच्याच गोरक्षक कार्यकर्त्यांना आपल्या पोलिस वाहनात डांबून ठेवले होते व कसायांना पळून जाण्यासाठी मुभा दिल्याचे या निवेदनात म्हटलेले आहे. त्यावेळी हे सर्व प्रकार बघून श्री किरण बिच्चेवार यांनी तत्कालीन वनमंत्री तथा अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना बोलल्याने नाविलाजास्तव सकाळी 11 वाजता पकडलेल्या वाहनांवर सायंकाळी 6 वाजता गुन्हा दाखल केला होता.
या गोष्टीचा राग मनात धरून शेख इजाज शेख इस्माईल व शेख जुनेद हे त्यांना मारण्याचा कट रचत असल्याची खात्रीलायक माहिती सतत मिळत असल्याची बाब बिच्चेवार यांनी दिनांक 04/07/2023 रोजी मा. पोलीस अधीक्षक नांदेड यांना निवेदनाद्वारे कळवले होते. त्यानंतर दिनांक 17/06/2023 रोजी मौजे सरसम येथे नियमित गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणारे एक वाहन हिमायतनगरच्या दिशेने येत असल्याचे पोलीस निरीक्षक श्री भुसनूर साहेबांना कळवले होते. पोलीस गाडी येईपर्यंत वाहन थांबवले असता वाहनासोबत मोटर सायकलवर असलेला इफ्तिकार शेख इस्माईल याने फोन करून हिमायतनगर येथील अब्दुल हमीद अब्दुल कादर, शेख इलियास शेख नबीसाब, शेख एजाज शेख इस्माईल व इतर 40 ते 50 लोकांना बेकायदेशीर रित्या बोलून ” बिचेवार अकेलाच है जल्दी आओ ” असे सांगितले तेव्हा चाकू लोखंडी रोड इत्यादी साहित्य घेऊन हिमायतनगर येथील 40 ते 45 कसाई आणि समाजकंटक बिच्चेवार यांना मारण्यासाठी आले होते.
वेळीच पोलीस गाडी आल्यामुळे बिच्चेवार हे बालमबाल बचावले होते. हिमायतनगर येथील हे कसाई वारंवार बिच्चेवार आणि त्यांच्या गोरक्षक कार्यकर्त्यांच्या मागावर राहून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे आणि जीवे मारण्याचा प्रयत्न वारंवार करणे यामुळे जर त्यांच्या जीवित्वास काही बरे वाईट झाले तर त्यास वरील हे सर्व कसाई जबाबदार राहतील. आणि पोलीस प्रशासन जबाबदार असेल या आशयाचे निवेदन दिनांक 28 रोजी पोलीस महानिरीक्षक नांदेड, मा. जिल्हाधिकारी साहेब नांदेड, मा. पोलीस अधीक्षक साहेब नांदेड यांना किरण बिच्चेवार, नांदेड विभाग गोरक्षा प्रमुख,विश्व हिंदु परिषद देवगीरी प्रांत यांनी दिले आहे.
