नांदेडराजकिय

लोहा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत भाजप खासदार चिखलीकरांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला

लोहा/नांदेड। नांदेड जिल्ह्यातील बहुचर्चित असलेल्या लोह येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचा निकाल रविवारी जाहीर झाला आहे. या निकालात महाविकास आघाडीने दणदणीत विजय मिळावीत बाजी मारली आहे. भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा गड असलेल्या लोहा तालुक्यात चिखलीकरांना मोठा धक्का बसला असून, त्यांचे भाऊजी तथा शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी बाजी मारत कंधार निवडणुकीचा बदला घेतला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आ. श्यामसुंदर शिंदे पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलने १८ पैकी १६ जागेवर एकतर्फी विजय मिळवला असून, ही निवडणूक लहान वाटत असली तरी निवडणुकीच्या धक्कादायक निकालानंतर आगामी निवडणुकीत याचे मोठे पडसाद दिसून येतील असे चित्र तरी सध्या दिसून येत आहे.

लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ जागेसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत सर्वाधिक म्हणजे ९८ टक्के मतदान झाले होते. नांदेडचे खा. प्रताप पाटील चिखलीकर आणि त्यांचे भाऊजी आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यात ही खरी लढाई होती. दोन्ही नेत्यांकडून प्रतिष्ठता पणाला लावून निवडणुकीच्या खड्यात पॅनल उतरविण्यात आले होते. त्यामुळे कंधार बाजार समितीच्या निवडणुकीत मेव्हुणा भाऊजींची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात कोणाचा वरचष्मा राहील याकडे नांदेड जिल्ह्यातील राजकीय वर्तुळातील नागरिकांचे लक्ष लागून होते.

कंधार प्रमाणेच लोहा बाजार समितीच्या निवडणुकीत खासदार प्रताप पाटील चिखलीकर हे वर्चस्व कायम ठेवत त्यांचे भाऊजी श्यामसुंदर शिंदे यांचा पराभव करतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र लोह्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीत भाऊजींकडून त्यांना चांगलाच झटका बसला आहे. शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या नेतृत्वातील शेतकरी विकास पॅनलचे १६ उमेदवार विजयी झाले. तसेच भाजपा पुरस्कृत बळीराजा पॅनलच्या दोन उमेदवारांनी विजय मिळवला आहे.

दरम्यान या विजयानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्या समर्थकाकडून लोहा शहरात गुलालची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आमदार श्यामसुंदर शिंदे, आ.मोहना अण्णा हंबर्डे, विधानसभा सदस्य आ. अमरभाऊ राजूरकर, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आ. रोहिदास चव्हाण, शिव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.मनोहर धोंडे आदींसह अनेक बड्या नेत्यांनी यात सहभाग घेतला होता. या निवडणुकीनंतर आता हा बालेकिल्ला अभेद्य ठेऊन येणाऱ्या सर्व निवडणूक अश्या प्रकारे एकत्र लढवून जिंकण्याचा निर्धार करण्यात आला आहे. मिरवणुकीत हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!