
हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायतीचे अखत्यारीत येणाऱ्या शहरातील सर्वच प्रभागातील पथदिवे गेल्या अनेक महिन्यापासून बंद पडलेले आहेत. त्यामुळे शहरातील नागरीकी भाविक भक्तांना अडचणींचा समान करावं लागतो आहे. हि बाब लक्षात घेता आणि आगामी महाशिवरात्री आणि रंजन ईदच्या पार्श्वभूमीवर तात्काळ पथदिवे चालू करून होणारे गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिवराव सातव यांनी कार्यालयीन अधीक्षक चंद्रशेखर महाजन यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
नगर पंचायत हिमायतनगरच्या अधिनिस्त असलेल्या शहरातील वार्ड क्रं. 1 ते 17 मधिल पथदिवे (स्ट्रिट लाईट) लाईट हे मागील दोन महिण्यांासुन बंद आहेत. त्यामुळे गावांतील नागरीकांना अत्यंत अडीचणीना सामोरे जावे लागत आहे. तसेच रस्त्याने अंधार असल्यामुळे अपघात होण्यांची शक्यता निर्माण झाली आहे. अंधाराचा फायदा घेवुन कांही चोरटे सक्रिय होण्यांची शक्यता नाकारता येत नाही व चोऱ्यांचे प्रमाण वाढण्यांची शक्यता आहे.
तसेच आता दिनांक 7 मार्च 2024 रोजी पासुन श्री. परमेश्वर देवाची यात्रा सुरु होत असुन, त्यामुळे गावांतील भाविकभक्त हे श्री परमेश्वर मंदिरातील किर्तन व इतर धार्मिक कार्यक्रमांना तसेच दर्शनासाठी यावे – जावे लागते व रस्त्याने अंधार असल्यामुळे त्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. तसेच मुस्लीम बांधवांचा पवित्र असा रमजान महिणा सुध्दा चालु होणार आहे. हि बाब लक्षात घेता मुख्याधिकारी यांनी आपल्या अधिनिस्त असलेल्या नगरपंचायत हिमायतनगर शहरातील वार्ड क्रं. 1 ते 17 मधिल संपूर्ण स्ट्रिट लाईट सुरु करून भाविक भक्तांची अडचण सोडवावी अशी मागणी माजी नगरसेविका सौ. सुरेखा सदाशिवराव सातव यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाच्या प्रति त्यांनी जिल्हाधिकारी साहेब, नांदेड, तहसीलदार साहेब, हिमायतनगर याना दिले आहे.
