
नवीन नांदेड। जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी येथे मराठा समाजाला सरसकट ओबीसी प्रवगातुन आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पांठीबा म्हणून असरजन येथे मराठा सकल समाज बांधवांचा वतीने भगतसिंग चौक येथे साखळी उपोषणाला १ नोव्हेंबर पासून सुरूवात केली आहे.
भगतसिंग चौक येथे फतेजंगपुर, असरजन, जयप्रकाश नगर भागातील सकल समाज बांधवांचा वतीने १ नोव्हेंबर पासून साखळी उपोषणाला सुरूवात केली आहे.मनोज जरांगे पाटील यांच्ये उपोषण चालू असेल तथापि कायम आरक्षणाच्या निकाल लागेल पर्यंत चालू राहणार आहे. मारोती धुमाळ व काळेश्वर धुमाळ यांच्या सह परिसरातील सकल समाज बांधवांचा वतीने अंत्यंत शांत पध्दतीने हे आंदोलन चालू राहणार आहे. या उपोषण बाबत जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व ग्रामीण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले आहे.
