धर्म-अध्यात्मनांदेड

भोकर तेथे श्री राम मंदिर जीर्णोद्धार, प्राणप्रतिष्ठा, छ. शिवाजी महाराज यांच्या 350 व्या स्वराज्याभिषेक दिनानिमित्त भव्य राम कथेसह शोभा यात्रेच आयोजन

भोकर,गंगाधर पडवळे| श्री राम मंदिर जिर्णोध्दार, श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या स्वराज्याभिषेक दिनानिमीत्त भव्य संगीतमय रामकथा यज्ञ सोहळा आयोजित करण्यात आला आहे तरी भोकर शहर व तालुक्यातील सर्व श्री राम भक्त यांनी या यज्ञात प्रत्यक्ष सहभागी होऊन या ऐतिहासिक कार्यकर्माचा साक्षीदार होण्याचे भाग्य प्राप्त करून घ्यावे असे आवाहन समस्त श्री राम भक्त यांनी शनिवारी दि.13 जानेवारी सायंकाळी आयोजित बालाजी मंदिर बैठकीत केले आहे.

सदरील कार्यक्रमाची रूपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे भव्य संगीतमय रामायण कथा यज्ञ सोहळा हा माऊलीधाम, नवा मोंढा भोकर जि. नांदेड येथे दि. १७/०१/२०२४ बुधवार ते दि. २१/०१/२०२४ रविवार कथेची वेळ : दुपारी १२ ते ४ वाजता असणार आहे तर सकाळी ११ ते १२ हनुमान चालीसा व रामरक्षा मंत्र पारायण दिनांक २२/०१/२०२४ रोज सोमवार सकाळी ७.३० वाजता काल्याचे किर्तन होईल तदनंतर सकाळी ८.३० पासून भोकर शहरातील मुख्य मार्गावरून भव्य शोभायात्रा ज्यात साधू, संत,महाराज, भजन, बँडपथक, राम नामजप, हनुमान चालिसा,आदिसह निघून ती परत माऊलीधाम नवा मोंढा येथे बरोबर ११.३० ला पोहचेल त्या नंतर ११.३० ते १.३० वाजता अयोध्या येथील श्री रामलल्ला मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना व श्री राम मंदिर जिर्णोध्दार भव्यदिव्य सोहळा नयनरम्य, डोळ्याचे पारणे फिटणारा, व गेली शेकडो वर्षा पासून याची प्रत्येक हिंदुला आतुरता लागली होती.

तो अविस्मरणीय, सुवर्णंक्षण सर्वांनां मोठ्या स्क्रिनवर थेट प्रक्षेपण प्रणालीद्वारे पाहणायास मिळणार आहे. महाप्रसादाने या यज्ञ सोहळ्याची सांगता होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तरी सर्व श्री राम भक्त यांनी या सर्व सोहळ्यास सहकुटुंब उपस्थित राहून पावन कार्यात सहभाग नोंदवून पुण्य पदरी पाडून घ्यावे असे विनम्र अहवानआयोजन समिती काडून करण्यात येत आहे. ही कथा आपणास राष्ट्रीय कथाकार, तथा सुप्रसिद्ध कीर्तनकार,रामायणाचार्य श्री ह.भ.प. शिवाजी महाराज वटबे आळंदी देवाची यांच्या सुश्राव्य वाणीतून ऐकावयास मिळणार आहे.व संगीत संयोजन मुख्य गायक संतोष देवकर गुरुजी,आळंदी,सह गायक गणेश महाराज सावळे हिंगोली, तबला वादक चक्रधर शिंदे बीड, पॅडवादक सुरज माने, झाकी गणेश महाराज परभणी, कीर्तिशःकुमार वैष्णव, मृदंगाचार्य ह.भ. प. गणेश महाराज काकीलवाड व भजनी मंडळ भोकर.

दिनांक २२/०१/२०२४ रोज सोमवार सकाळी लवकर आपआपल्या घरासमोर व आपल्या परिसरात सडा, सरावण,रांगोळ्या टाकणे, घरांवर गुढी उभारणे, भगवा ध्वज लावणे, फटाके उडविणे अर्थातच गुढी पाडवा व दिपावली साजरी करणे, सायंकाळी दिपोत्सव साजरा करणे घराघरात दिप लावणे आपल्या परिसरातील मंदिरात दिपोत्सव करणे, ध्वज लावणे, रामनाम जप करणे, किर्तन, प्रवचन, भजनाचे आयोजन करणे, आरती करणे, फटाके, बॅन्ड, वाजवून आनंद उत्सव साजरा करणे व महाप्रसादाचे आयोजन करणे असे आवाहन आयोजक श्री रामभक्त, भोकर विचार विकास मंच व समस्त गांवकरी मंडळी, लोकोत्सव समित भोकर,समस्त हिंदू समाज, भोकर तालुका यांच्या तर्फे करण्यात येत आहे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!