नांदेडलाईफस्टाईल

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने तालुका स्तरावर शिबीर कार्यालयाचे आयोजन

नांदेड| प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने शिकाऊ व पक्के अनुज्ञप्तीकरीता जानेवारी 2024 ते जून 2024 या कालावधीत पुढीलप्रमाणे तालुका शिबीर कार्यालयाचे आयोजन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या शिबिरासाठी जागा उपलब्धतेच्या आधीन राहून ऑनलाईन अपॉईटमेंट ही महिना सुरू होण्याच्या 5 दिवस आधी कार्यालयीन वेळेत सुरू करण्यात येईल. अपाईमेंट घेतलेल्या सर्व अर्जदारांनी याबाबतची नोंद घेऊन शिबीर कार्यालयास उपस्थित रहावे, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी शैलेश कामत यांनी केले आहे.

कंधार तालुक्यासाठी 3 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 4 मार्च, 3 एप्रिल, 3 मे, 4 जून असे राहील तर धर्माबाद 5 जानेवारी, 6 फेब्रुवारी, 6 मार्च, 5 एप्रिल, 7 मे, 7 जून 2024. किनवट तालुक्यासाठी 8 जानेवारी, 8 फेब्रुवारी, 12 मार्च, 10 एप्रिल, 10 मे, 10 जून. मुदखेड तालुक्यासाठी 15 जानेवारी, 14 फेब्रुवारी, 14 मार्च, 16 एप्रिल, 15 मे, 14 जून. माहूर तालुक्यासाठी 17 जानेवारी, 16 फेब्रुवारी, 18 मार्च, 18 एप्रिल, 17 मे, 18 जून. हदगाव तालुक्यासाठी 19 जानेवारी, 20 फेब्रुवारी, 20 मार्च, 22 एप्रिल, 22 मे, 21 जून. धर्माबाद तालुक्यासाठी 22 जानेवारी, 23 फेब्रुवारी, 22 मार्च, 24 एप्रिल, 24 मे, 24 जून. हिमायतनगर तालुक्यासाठी 25 जानेवारी, 27 फेब्रुवारी, 26 मार्च, 26 एप्रिल, 28 मे, 26 जून. किनवट तालुक्यासाठी 30 जानेवारी, 29 फेब्रुवारी, 28 मार्च, 30 एप्रिल, 30 मे, 28 जून 2024 याप्रमाणे तालुका शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

NewsFlash360 Staff

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!