उस्माननगर, माणिक भिसे। (शिवसेना उबाठा) गटाचे नांदेड जिल्हा उपशहर प्रमुख एकनिष्ठ शिवसैनिक पिंटू उर्फ बालाजी सुनपे यांची नांदेड जिल्हा शहर संघटक पदी निवड करण्यात आली ही निवड जिल्हा प्रमुख बबनराव बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांच्या शिफारसीवरून करण्यात आली आहे.
बालाजी सुनपे यांनी याआगोदर उपशहर प्रमुख म्हणून उत्तम कामगिरी केली असल्याने त्यांना मुंबई येथे मातोश्री वर निवडीचे नियुक्ती पत्र देण्यात आले त्यांच्या या निवडीबद्दल जिल्हा प्रमुख बबनराव बारसे,ऍड. शाम बन, रवींद्र शर्मा, कैलास टेळके, काजी सल्लाओदिन, महेश भांगे, पत्रकार शुभम डांगे, सतीश टेळके, आकाश सगर, कपिल वाडीकर, निकीलेश जाधव, संतोष कदम, ज्ञानेश्वर डोणेकर सूरज जाधव, अक्षय डांगे सह सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.