नांदेडमहाराष्ट्र

रघूपती राघव राजाराम हे भजन गाऊन तमाम ग्रामस्थांचे वेधले लक्ष-डॉ.हंसराज वैद्य

नांदेड| आवचित्य होते ज्येष्ठ नागरिक जाग्रण मोहिम. अयोध्या नगरितील राम मंंदिरातील प्रभू रामचंद्रजींच्या प्राण प्रतिष्ठेच्या आदल्या दिवशी सकाळी काटकळंब्यातील ज्येष्ठ नागरिकांच्यावतीनेे एक व्यापक बैठक घेण्यात आली. ही बैठक हनुमान मंदिराच्या प्रांगणात घेण्यात आली. बैठकिस काटकळंबा गाव व परिसरातील ज्येष्ठ नागरिक महिला पुरूष, विधवा तसेच तरूणांनीही गर्दी केलेली होती.

मंदिराच्या गच्चीवर राम भक्त हनुमान वंशावळींचीही बरीच गर्दी लहान मोठे मिळून 10-12 असावेत, बघण्यास मिळाली! बैठकिचे प्रास्ताविक मोहन कामाजी पवार यांनी तर सुबक सुत्रसंचलन विश्वांभर मोहन बसोदे यांनी केले. व्यासपिठावर नारायण साहूकार केशटवार, गजानन चौंडे पो.पा. तथा गोविंदरावजी वाकोडे माजी पो.पा.हे विराजमान होते. डॉ.पुष्पा कोकीळ व श्री गिरिष बार्हाळे यांनी ज्येष्ठांना यथोचित व यथा सांग मार्गदर्शन केले. डॉ.हंसराज वैद्य यांनी ज्येष्ठ नागरिक म्हणजे काय?, संघ स्थापण कसा करायचा? त्याचे महत्व, फेस्कॉम संघटणा, आजपर्यंत ज्येष्ठ नागरिकांसाठी केलेले कार्य, फेस्कॉमसी संलगन होण्याची गरज आदि बाबींबर सविस्तर माहिती दिली.

अध्यक्षिय समारोप शासन मान्यता प्राप्त ज्येष्ठ पत्रकार तथा दलित मित्र माधवराव पवार काटकळंबेकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी धडाडीचे कार्यकर्ते भाऊराव कस्तूरे, शादुल व इतर समस्त गावकऱ्यांनी प्रचंड मेहनत घेतली. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.हंसराज वैद्य यांनी प्रभूरामचंद्रांचे “रघूपती राघव राजाराम.. पतित पावन सीताराम.. हे सुंदर भजन उंच स्वरात चालीवर गायीले व जमलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांनी आणि ग्रामस्थानींही त्यांना साथ देऊन दाद दिली व कार्यक्रमाची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!