उस्माननगर माणिक भिसे| मी कसा घडलो संयोजन समितीच्या वतीने शून्यातून विश्व निर्माण करणारे मौजे दाताळा ता . कंधार नांदेड येथील रहिवासी आणि नांदेड जिल्ह्यातील उद्योजक बाबुराव कसबे यांना ” किस्ना “गौरव पुरस्कार -२०२४ सन्मानित करण्यात आले. नांदेड येथील देवकृपा फंक्शन हॉल येथे झालेल्या एका समारंभात त्यांना प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत गौरविण्यात आले.
यावेळी संयोजन समितीचे सोनू दरेगावकर ,भारत दाढेल , राहुल वाघमारे ,अविनाश पाईकराव, दत्तप्रकाश तालीमकर, शरद वाघमारे सचिन मोहिते ,आणि विनोद पंचंगे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती. उस्माननगर येथून जवळच असलेल्या मौजे दाताळा या छोट्याशा गावातून आलेल्या बाबुराव कसबे यांनी रियल इस्टेटमध्ये उत्कृष्ट कार्य करून यशाचे शिखर गाठले आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनतीतून ठरवलेले उद्दिष्ट गाजता येते असे मत बाबुराव कसबे यांनी व्यक्त केले. त्यांना यापूर्वीही अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
हालाखीच्या परिस्थितीत स्पर्धेच्या युगात आपले स्किल वापरून बाबुराव कसबे यांनी उंच भरारी घेतली आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन ” मी कसा घडलो ” संयोजन समितीच्या वतीने त्यांना ” किस्ना ” गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. बाबुराव कसबे यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे श्री.गोविंद बोदेमवाड ( मुख्याध्यापक समता मा.व . उच्च मा.विद्यालय उस्माननगर ) उद्योजक बाबुराव कोपरे , प्राचार्य गणेश मोरे , जयवंतराव शिंदे ( म. शि. सं.तालुका अध्यक्ष) , संजय फुलवळे ( मा. सरपंच ) , शिंदे ( सरपंच ) रामदास बोदेमवाड , कृष्णकुमार पद्माकर यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे