
नांदेड। सुमित शरद ढेंबरे वय 16 वर्ष राहणार बेरळी ता. लोहा जि. नांदेड येथिल अवघ्या 16 वर्षाच्या तरुणाने सगेसोयरे कायदा आमलात आणण्यासाठी सरकार चालढकल करीत असल्यामुळे जमिनीवर च्या फरशीवर मजकूर लिहून गळफास घेत आत्महत्या केली आहे.
मराठा समाज हा निकषाने ओबीसी प्रवर्गात बसत असुन असुन सुद्धा ओबीसी आरक्षणा पासून वंचित असल्यामुळे मराठा समाजाला त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे प्रचंड नुकसान मराठा समाजाचे होत असल्यामुळे तरुणाई अतिशय डिप्रेशन मध्ये जात असुन भावनिकतेच्या आहारी जाऊन टोकाचं पाऊल उचलत आहेत, त्यामुळे सरकारने अजुन किती बळी घ्यायचे ठरवले आहे असा जळजळीत सवाल मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी सरकारला केला आहे.
निवडणुकीच्या धामधूमीत असणारे मस्तवाल राजकारणी आज समाजाच्या मागण्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत आहेत, याचा परिणाम येणाऱ्या काळात सर्वच राजकीय पुढऱ्यांना भोगावे लागतील एवढं मात्र निश्चित.
