अयोध्या येथून आलेल्या अक्षताचे स्वागत केल्यानंतर परिसरात भव्य कलश यात्रा
नांदेड। शहरातील शिवशक्तीनगर भागात अयोध्या येथून आलेल्या अक्षताचे स्वागत केल्यानंतर या संपूर्ण परिसरात भव्य कलश यात्रा काढण्यात आली असून धर्मभूषण ॲड. दिलीप ठाकूर, शशिकांत भुसेवाड व धीरज यादव यांच्या मार्गदर्शनाखाली घरोघर जाऊन अक्षता, निमंत्रण पत्र व मंदिराचा फोटो वाटप करण्यात आले.१६ जानेवारीपासून एक सप्ताह भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.*
कलामंदिर येथून कलश यात्रेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नरसिंह कहाळेकर, दीपकसिंह ठाकूर, राहुल भुसेवाड,बिरबल यादव, ॲड. करण जाधव, गोविंद पालवेकर , अशोक शिंदे यांनी फटाक्याच्या आतिशबाजी केली. जय श्रीराम च्या जयघोषनांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. शेकडो महिला डोक्यावर कलश घेऊन भक्ती भावाने यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या.
त्यामध्ये कालिंदी कहाळेकर, ज्योती नगारे, जयश्री ठाकूर, हिरुताई भंडारे,निर्मला यादव, लक्ष्मीबाई गुटाळ, ममता यादव, सुनिता ठाकूर, संगीता यादव, निर्मला भोसले, सुनिता यादव, मीनाक्षी नगनुरवार, हेमलता यादव, लक्ष्मीबाई द्रोपदीवार, अनिता यादव, जया नगारे, फुलाबाई भोसले , सुशिलाबाई, गंगुबाई मारावार, पार्वती यादव, गंगाबाई, सीमा भोसले, सुमित्रा टाकळीकर, कांचन यादव यांच्यासह अनेकांचा समावेश होता. बंटी अग्रवाल,नारायण पालवेकर,बालाजी नगारे,चंद्रकांत कांबळे,गोविंद पालवेकर,सचिन पवार,कुणाल भुसेवाड, संतोष भारती, गजानन मारावार,सुभाष गुटाळ, श्याम यादव, ऋषिकेश भारती,बालाजी जाधव, श्री नगारे, गोपाल भारती यांच्यासह अनेकांनी ठिकठिकाणी कलश यात्रेवर पुष्पवृष्टी केली.
महिलांनी आपल्या घरासमोर रांगोळ्या काढल्या होत्या. ढोल ताशाच्या गजरात भगवे झेंडे हातात घेऊन निघालेली कलश यात्रा स्वामी समर्थ मंदिर परिसर ,सोमेश कॉलनी, भारत नगर, शिवशक्ती नगर, धम्मनगर, मील रोड भागातून फिरवण्यात आली. पाचशे वर्षा पासून सुरू असलेला राम मंदिराचा संघर्ष पूर्ण होत असल्यामुळे तरुणांनी नाचून आनंद व्यक्त केला. सोन्या मारुती मंदिरात महाआरतीने सांगता करण्यात आली. दिलीप ठाकूर व शशिकांत भुसेवाड यांच्यातर्फे सर्वांच्या चहा फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.
दुसऱ्या दिवशी या भागातील तीनशे घरी जाऊन अक्षता, निमंत्रण पत्र व मंदिराचा फोटो वाटप करण्यात आले. महिलांना हळदी कुंकू लावून व पुरुषांना कुंकुमतिलक करून विधीवत आमंत्रण देण्यात आले. यावेळी मुलींचा उत्साह वाखावगण्याजोगा होता. चार मजली इमारतीच्या प्रत्येक घरामध्ये पायी जाऊन प्रत्यक्ष निमंत्रण देण्यात आले. निमंत्रण देण्यासाठी शितल यादव,प्राची टापरे, मनीषा यादव, मयुरी यादव, आराध्या यादव, अनोखी यादव,साक्षी टापरे,कविता यादव, अश्विनी, अमृता, वंदना, प्रीती, माधुरी यांनी परिश्रम घेतले.
राजेश यादव यांच्यातर्फे ध्वनीक्षेपक व्यवस्था तर राहुल भुसेवाड यांच्यातर्फे ढोल ताशाची व्यवस्था करण्यात आली होती. १६ ते २१ जानेवारीपर्यंत सोन्या मारुती मंदिर येथे दररोज सायंकाळी ७ वाजता सामूहिक हनुमान चालीसा, भजनसंध्या व महाआरती ठेवण्यात आली आहे. २२ जानेवारी रोजी प्रत्येक घरासमोर रांगोळी , तसेच किमान ११ दिवे, आणि घरावर भगवे झेंडे तथा विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या भागातील महिलांसाठी रांगोळी स्पर्धा ठेवण्यात आली असून ११ महिलांना रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
दुपारी अकरा ते एक दरम्यान अयोध्या येथे नरेंद्रभाई मोदी यांच्या हस्ते होणाऱ्या मूर्ती प्राणप्रतिष्ठापनाचे मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करण्यात येणार आहे. दुपारी एक ते दोन दरम्यान महाआरती झाल्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सहा वाजता शशिकांत भुसेवाड मित्र मंडळातर्फे नामांकित वाद्यवृंदांची भजनसंध्या आयोजित करण्यात आली आहे. तरी या सर्व कार्यक्रमाला रामभक्तानी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.