
नांदेड| आज सकाळी 9 वाजता पासून सर्व सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून सर्व व्यापारी वर्गाना आपली प्रतिष्ठाणे बंद ठेऊन सहकार्य करा अशी विनंती केली. आणि दुपारी ठिक 12 वाजता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या मार्फत निवेदन सादर करून, सदरील प्रकरणावर व मराठा आरक्षणाच्या चालु घडामोडीवर सविस्तर चर्चा केली.
आजपर्यंत जिल्ह्यातील आढळून आलेल्या नोंदी व देण्यात आलेल्या कुणबी जात प्रमाणपत्र यावर सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांनी खुलासा करीत आजच्या बंद दरम्यान मराठा समाजाच्या तीव्र भावना ह्या सरकार ला आज च्या VC मिटिंग मधुन थेट सांगण्यात येतील व सदरील निवेदन हे तात्काळ मुख्यमंत्री कार्यालयात पाठवण्यात येईल असा विश्वास आंदोलन कर्त्या समाज बांधवाना दिला. सदरील बंद हा नांदेड शहरामध्ये वरदळीचे ठिकाण असणारे आनंद नगर भाग्यनगर हा मुख्य रस्ता व तेथील प्रतिष्ठाने हे सायंकाळी पाच सहा वाजेपर्यंत बंद दिसली.
यावेळी मराठा सेवक श्याम पाटील वडजे, गिरीश जाधव, गजानन कहाळेकर, नानासाहेब वानखेडे, माधव घोगरे, राम माळगे, दिनेश पुरी, बालाजी कदम, विक्रम पाटील, पद्माकर पाटील, संतोष कपाटे, गोविंद पाटील मोरे,गोविंद ढाकनिकर, भास्कर हंबर्डे,यासह इतर सकल मराठा समाजाचे बांधव उपस्थित होते.
