पोस्ट ऑफिस मधून लहान बाळाचे आधार कार्ड योजनेचा लाभ घ्यावा: डाक अधिक्षक
नांदेड,अनिल मादसवार। दि.५ रोजी नांदेड शहरातील प्रसिद्ध डॉ.धनंजय आलूरकर यांनी आपल्या आपल्या लहान मुलगी कु.मुग्धा धनंजय आलूरकर वय तीन महिन्यांच्या मुलींचे नवीन आधार कार्ड पोस्ट ऑफिस शाखा डाकपाल के.बी.टेकाळे यांच्या काडून मोफत घेतले आहे.
ही योजना नांदेड जिल्ह्यातील सर्व ग्रामीण भागातील पोस्टमन व पोस्ट मास्तर यांच्याकडे उपलब्ध करून दिली आहे.
नागरिकांनी आपल्या बाळाचे नवीन आधार कार्ड काडून घ्यावे असे अहवान नांदेडचे यशस्वी डाक अधिक्षक श्री.राजीव पाळेकर साहेब यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे.
तसेच पोस्ट ऑफिस मध्ये विविध प्रकारच्या योजना पोस्ट ऑफिस राबविण्यात येत आहेत यामध्ये अपघाती विमा वार्षिक ३९९ रुपये दहा लाख रुपयांचा मिळेल तर महिला सन्मान बचत पत्र,बचत खाते,अटल पेन्शन योजना, डाक जीवन विमा योजना या योजना शेवटच्या व्यक्ती पर्येंत पोहचवण्यासाठी ठीक ठिकाणी मेळावे व प्रचार व प्रसार करीत आहेत. नागरिकांनी आपली आर्थिक गुंतवणूक पोस्ट ऑफिस मध्ये करावे असे डाक अधीक्षक सांगितले. यावेळी साहयक डाक अधीक्षक श्री.सुनील मामीडवार साहेब रवी भालेराव साहेब,व डाक कर्मचारी उपस्थित होते.