नांदेडमहाराष्ट्र
जिल्हा माहिती अधिकारी पदाचा प्रवीण टाके यांच्याकडे पदभार
नांदेड| नांदेडच्या जिल्हा माहिती अधिकारी पदाचा सोमवारी प्रवीण टाके यांनी पदभार स्वीकारला. प्रवीण टाके हे नागपूर येथून नांदेड येथे या पदावर रुजू झाले आहेत.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या बदली आदेशानंतर यापूर्वीचे जिल्हा माहिती अधिकारी विनोद रापतवार हे नागपूर येथे रुजू झाले आहेत. त्यांच्या जागेवर प्रवीण टाके यांनी आज पदभार सांभाळला. प्रवीण टाके यांनी यापूर्वी नवी दिल्ली, मुंबई, चंद्रपूर, नागपूर या ठिकाणी जिल्हा माहिती अधिकारी व समकक्ष पदावर काम केले आहे.
यापूर्वी लोकमत, सामना तरुण भारत, नागपूर पत्रिका आदि वृत्तपत्रांमध्ये पत्रकारितेचा दीर्घ अनुभव असलेले प्रवीण टाके एक प्रतिभावान कवी,लेखक असून त्यांची फकीर ही कादंबरी प्रकाशित आहे. विविध वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर त्यांनी स्तंभलेखन केले आहे.