हिमायतनगर, परमेश्वर काळे| देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण देशभर गाव चलो अभियान राबविण्यात येत असून, या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध योजनेचा लाभ ग्रामीण भागातील प्रत्येकाला लाभ मिळाला कि नाही याची माहिती घेतली जाणार आहे. या संदर्भात आज हिमायतनगर येथे बैठक हदगावचे संयोजक तुकारामजी चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांच्या नेतृत्वात पूर्ण देशभर गाव चलो अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, नांदेडचे खासदार प्रतापरावजी चिखलीकर, माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांताताई पाटील, नांदेड उत्तर जिल्हाध्यक्ष किशोर भाऊ देशमुख, यांचा मार्गर्शनाखाली नांदेड उत्तर हदगाव हिमायतनगर संयोजक तुकारामजी चव्हाण यांच्या नेतृत्वात हिमायतनगर ओबीसी तालुकाध्यक्ष राम पाकलवार यांच्या प्रतिष्ठान वरद बीज भांडार येथे बैठक घेण्यात आली.
यावेळी गाव चलो अभियान हदगावचे संयोजक तुकारामजी चव्हाण यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सशक्त शेतकरी समृद्ध भारत, अंत्योदय हाच मंत्र, सबका साथ सबका विकास, राष्ट्र प्रथम सशक्त भारत, पायाभूत सुविधांचा अभूतपूर्व विकास, आरोग्यम धनसंपदा, महिला शक्तीला नवी गती, राज्यातील पायाभूत सुविधांचा विकास, सामाजिक न्याय, कृषी कल्याण, गडकिल्ले आणि तीर्थक्षेत्रांचे संवर्धन अशा विविध योजनांवर मार्गदर्शन केले. या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गाव चलो अभियान सुरू करण्यात आले असून, आम्ही प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली.
या बैठकीला गाव चालो अभियान हादगावचे संयोजक तुकारामजी चव्हाण, जिल्हाउपाध्यक्ष सुधाकर पाटील, जिल्हा सरचीटणीस आशिष सकवान, हिमायतनगर अभियान संयोजक रामभाऊ सुर्यवंशी, नांदेड उत्तर महामंत्री सूर्यकांत हानवते, माजी शहराध्यक्ष बाळा पाटील, अनुसूचित जाती जमाती हदगाव तालुकाध्यक्ष किशनराव कांबळे, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष राम पाकलवार, अनुसूचित जाती जमाती हिमायतनगर तालुकाध्यक्ष दत्ता शिराणे, विनायक ढोणे, दयानंद थोटे, वामन पाटील मिराशे वडगावकर, विकास भुसावळे, गंगाधर मिरजगावे, बालाजी ढोणे, गजानन गोपेवाड, दिपक बाष्टेवाड, लक्ष्मण चव्हाण, अभिलाष जैस्वाल, दत्ता अनगुलवार, बालाजी मिराशे, अजय जाधव, बुथप्रमुख, ओरियर्स आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.