नांदेडलाईफस्टाईल

हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक संपन्न

हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर ग्रामीण रुग्णालयात रुग्ण कल्याण समितीची बैठक आज दि.१० रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉ.विकास जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत विविध कामकाजाचा आढावा घेण्यात आला तसेच नगरपंचायत प्रशासनाला शहरातील स्वच्छतेच्या व रुग्णालयीन परिसर स्वचतेबाबतच्या सूचना देण्यात आहे.

या बैठकीत रुग्णालयीन कामकाज आणि उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबद्दल सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच रुग्णालय परिसराची स्वच्छता करणे आणि रुग्णांना कोणतीही अडचण येणार नाही याबाबत सर्वानी दक्षता घेऊन आपली कर्तव्य चोख बजावत रुग्ण सेवा द्यावी असे आवाहन करण्यात आले. यावेळी रुग्णालयीन कामकाजाबाबत वैद्यकीय अधीक्षक डॉ.विकास जाधव यांनी येथील सर्व डॉक्टर, कर्मचारी, नर्स आणि इतर सेवा देणाऱ्यांचे कामकाजाचे कौतुक त्यांनी केले.

सध्या रुग्णलयाचे बांधकाम अंतिम टप्यावर आले असून, त्यानंतर येथील रुग्णालय हे ५० खटाचे होणार आहे. त्यामुळे शहरातील व ग्रामीण भागातील नागरिकांना शासणाच्या नियमानुसार योग्य तो उपचार मिळणार आहे. आजघडीला रुग्णांना अपुरी जागा पडत असल्यामुळे थोडी अडचण येत असली तरी आमचे अधिकारी कर्मचारी रुग्णांची सेवा तत्परतेने करत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. येथील रुग्नालयाच्या कामकाजाकडे विशेषतः आमदार जवळगावकर यांचे नेहमी लक्ष असते. त्यांनी आत्तापर्यंत अचानक भेटी देऊन रुग्णसेवेची पाहणी करून शाबासकी दिली आहे. त्यामुळे आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना रुग्ण सेवा देण्यासाठी प्रोत्साहन मिळत आहे.

तसेच रुग्णालयाच्या आजूबाजूच्या जुन्या इमारती दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव आम्ही वरिष्ठाकडे सादर केला आहे. त्यामुळे नुकतेच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निळकंठ भोसीकर यांनी हिमायतनगर येथील ग्रामीण रुग्णालयास भेट देऊन येथील कामाजाचा आढावा घेऊन समाधान व्यक्त केले आहे. त्यानंतर तहसीलदार यांनी रुग्णालयास भेट देऊन पाहणी करून रुग्णालयात आवश्यक असलेल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे रुग्णाच्या नातेवाईकाना बसण्यासाठी आसन व्यवस्थ, प्रतिक्षालय, रुग्णालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर अन्य सुविधा लवकरच उपलब्ध होतील यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. येथील पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेता रुग्णांसाठी दररोज बिस्लेरीचे पाणी आपण घेऊन सेवा देत आहोत. पुढील काळात रुग्णालयात कायमस्वरूपी आर. ओ. मशीन बसून रुग्णांना स्वच्छ पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.

यावेळी झालेल्या बैठकीचे रुग्णालयात होणाऱ्या यशस्वी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया बाबत संधान व्यक्त करण्यात आले. याप्रसंगी एनजीओ प्रतिनिधी दिलीप राठोड, नगरपंचायतचे प्रतिनिधी बालाजी हरडपकर, बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिनिधी किशोर थेटे, डॉ.बुरकुले, डॉ.सदावर्ते, डॉ.अलका राणी मुनेश्वर, डॉ.गणेश कदम, पंडित शिलकर,धर्मपाल पाटील, तालुका आरोग्य अधिकारी विभागाचे प्रतिनिधी नागमवाड, तहसील व गटविकास अधिकारी कार्यालय प्रतिनिधी, रमेश धांडे, संतोष मामीडवार, रुपाली मेश्राम, शे.मोबीन, संतोष नारखेडे, गजानन डुकरे, दीपक इंगोले, पंडित साबळे, महेश साळुंके, गणेश वाघमारे, श्रीनिवास डोपलवार, सदाशिव राठोड, आदींसह रुग्णकल्याण समितीचे सर्व सदस्य व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!