नांदेड। जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्यावतीने आज सकाळी १० वाजता काळेश्वर घाटविष्णुपूरी येथे जिल्हाधिकारी तथा अध्‍यक्ष जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरण अभिजीत राऊत यांच्‍या आदेशानुसार व निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्‍या मार्गदर्शनाखाली मान्‍सून-२०२४ पूर्वतयारी-पूर परिस्‍थिती शोध व बचावाबाबत रंगीत तालीम संपन्‍न झाली.
 
माहे जूनमध्‍ये मान्‍सूनचे आगमन होणार आहे.  मान्‍सूनच्‍या काळात अतिवृष्टी होऊ शकते. नदीकाठच्‍या गावात पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. अशा पूर परिस्‍थ‍ितीच्‍या वेळी जिवीत व वित्त हानी कशी टाळता येऊ शकते. यासाठी पूर परीस्‍थ‍ितीत शोध व बचाव कसा करावा याबाबत काम करणाऱ्या सर्व यंत्रणाचे प्रशिक्षण काळेश्‍वर घाट विष्णुपूरी येथे संपन्‍न झाले. यावेळी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकाअग्‍नीशमन दलशीघ्र प्रतिसाद दलगृहरक्षक दलउपविभागीय अधिकारी व तहसिल कार्यालयपंचायत समिती नांदेड व इतर अधिकारीकर्मचारी यांची उपस्थिती होती.
 

या रंगीत तालीमेस उपविभागीय अधिकारी विकास मानेतहसिलदार संजय वारकडजिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी किशोर कुऱ्हेअग्‍नीशमन अधिकारी केरोजी दासरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी सूत्रसंचालन  जिल्हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचे बारकुजी मोरे यांनी केले तर आभार तहसिल कार्यालयाचे रवि दोंतेवार यांनी मानले. यावेळी मंडळ अधिकारी पी.व्‍ही.खंडागळेए.एम. धुळगुंडेएस.डी.देवापुरकरप्रमोद बडवणेगृहरक्षक दलाचे एम.बी.शेखप्रवीण हंबर्डेबालाजी सोनटक्‍केमंडगीलवार आर.बी.गौरव ति‍वारीकोमल नागरगोजे आदींनी परीश्रम घेतले. तर मनपा नांदेडपोलीस क्‍यु.आर.टी.होम गार्ड,जिल्हा शल्‍य चिकित्सक कार्यालयाचे आरोग्‍य पथकमंडळ अधिकारीतलाठीग्रामसेवक पोलीस पाटील कोतवालासह विविध यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी उपस्‍थ‍ित होते.

Share.

या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.

Leave A Reply

error: Content is protected !!
Exit mobile version