कंधार, सचिन मोरे। महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम हे संपूर्ण जगाला वंदनीय असून त्यांनी शुन्यातुन इतिहास घडवला,त्यांचे कार्य हे अजरामर असुन येणाऱ्या पिढीला सतत प्रेरणादायी आहे,त्यामुळे युवक तरुण मित्रांनी प्रतिकुल परिस्थीतीला दोष न देता आहोरात्र कठोर परिक्षम घेत यशस्वी व्हावे असे अवाहन कंधार चे तहसिलदार तथा न.पा.चे मुख्याधिकारी राम बोरगावकर यांनी केले.
नगर परिषद संचलीत डॉ. बाबासाहेब वाचनालय कंधार येथे १५ ऑक्टोबर २३ रोजी भारताचे माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्य वाचनालयातर्फे वाचन प्रेरणा दिवसांचे दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, या मध्ये १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ठिक १०:०० वाजता ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या निवडक ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले,तर १६ ऑक्टोबर रोजी वाचनालयाच्या अभ्यासकेतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमांचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसिलदार राम बोरगावकर व एस.बी आय चे शाखाधिकारी विलास रिनायत यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोरगावकर म्हणाले की कंधार हे एक ऐतिहासिक शहर असून या शहराला मोठा इतिहास आहे,येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हे समृद्ध वाचनालय असून येथे विपुल ग्रंथसंपदा आहे,येणारा काळ हा स्पर्धेचा असून या काळामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर झोकून देऊन कष्ट करा चांगल्या गोष्टीचा अंगीकार करा मोबाईलचा गैरवापर टाळा व वाईट व्यसनांपासून दूर रहा जीवन जगण्यासाठी खूप मार्ग आहेत,मेहनत घ्या,संघर्ष करा,आयुष्य हे सुंदर आहे,त्याचा उपभोग घ्या,असे आव्हान बोरगावकर यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ.आंबेडकर डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम व सरस्वती मातेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली,यावेळी या वाचनालयास लवकरच बँकेमार्फत दान स्वरूपात आरो प्लॉट देण्यात येणार असल्याचे बोरगावकर यांनी जाहीर केले. यावेळी सहाय्यक ग्रंथपाल मोहम्मद रफीक सत्तार यांनी उपस्थितांचे स्वागत केले,या कार्यक्रमास तलाठी बालाजी केंद्रे वीरेंद्र गरुडकर,सचिन मोरे,न.पा.चे कार्यालयीन निरीक्षक जितेंद्र ठेवरे, दत्ता आयनवाड,मिलिंद महाराज,श्रीमती कमलबाई जाधव,प्रकाश गुंडेकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.
ग्रंथ प्रदर्शनास अनेकांच्या भेटी…मान्यवरांकडून कौतुक
दि.१५ ऑक्टोबर आयोजित वाचन प्रेरणा दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शनास अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या,मान्यवरांनी न.पा.चे ग्रंथपाल मोहम्मद रफीक व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे तोंड भरून कौतुक करत वाचनालयाच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगराध्यक्ष रामराव पवार,व्ही के कांबळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक वाय जी महाबळे,सेवानिवृत्त शिक्षक ई जे बनसोडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या.