नांदेडलाईफस्टाईल
सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी अरुणराव कपाळे यांना मातृशोक
हिमायतनगर। तालुक्यातील सवना (ज) येथील रहिवाशी श्रीमती रुख्मिनबाई नारायण कपाळे (९८) यांचे वृद्धापकाळाने १० जानेवारी रोज बुधवारी ५.०० वाजता राहत्या घरी निधन झाले.
त्यांच्या पार्थिवदेहावर ११ जानेवारी रोजी दुपारी १.०० वाजता सवना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा, दोन मुली, नातू, पणतू असा परिवार आहे. त्या सेवानिवृत्त बी.एस.एन.एल. कर्मचारी अरुणराव कपाळे यांच्या मातोश्री होत.