नांदेड। सरकार बदलल्यावर एका वर्षातच रुग्ण मृत्युमुखी पडत असल्याचा सूर विरोधी पक्षाचे नेते आवळत आहेत. त्यांना हि वेळ उत्तर देण्याची नाही. पण अडीच वर्ष तुमचे सरकार होते. त्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात भंडाऱ्यात ११ बालकांचा शॉर्टसर्किटने जळून मृत्यू झाला होता. त्या मतांचे अश्रू नाही दिसले का..? तुम्हाला. त्यावेळी आरोग्यमंत्र्यांचा राजीनामा का मागितला नाही. अन् आता नांदेडला येऊन सुप्रियाताई सुळे या आरोप करून गेल्या. तुमच्या वेळचे सांगता येत नसले तर मी येते सांगायला. तुम्ही सध्या राजकीय सलाईन घेऊन फिरत आहात, असा आरोप भाजप महिला मोर्चांच्या प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ यांनी केला.
त्या नांदेड येथील डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात पाहणी करण्यासाठी सोमवारी नांदेडात आल्या होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या कि, मृत्यू पावलेल्या घटनेचे समर्थन आम्ही कदापि करणार नाही. परंतु रुग्णालयात २०२० ते २०२३ पाऱ्यांत आतापर्यंत दररोज सरासरी होणारे मृत्यू है १३ च्या जवळपास आहेत. ग्रामीण भागात काम करणाऱ्या आशा वर्कर गोळ्या देतात, परंतु महिला त्या घेत नाहीत. अशी माहिती बालरोग विभागातील काही बाळांच्या आईने दिली. डॉक्टरने सांगितलेल्या गोळ्या घेतल्या असत्या तर बाळ सुदृढ झाले असते है मी त्यांना सांगितले. आपण त्यांना गोळ्या देऊ शकतो. परंतु गीळायला देऊ शकत नाही, आयसीयू मध्ये कधीच औषधी साठ्यांचा तुटवडा नव्हता. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी देखील औषधी साठा उपलब्ध होता. आम्ही डॉक्टर नाहीत पण रेकॉर्डवरील माहिती देत आहोत असेही वाघ म्हणाल्या.
गेल्या ३ वर्षाच्या रेकॉर्डवरून रुग्ण हे अत्यवस्थ झाल्यानंतर येथे आणले जातात. खाजगीत उपचार संपल्यानंतर रुग्ण घरी घेऊन जा म्हणून सांगितले जाते. ज्यावेळी सगळे नाकारतात तेव्हा घरी नेण्यापेक्षा सरकारीत दाखल करू म्हणून इकडे लोक येतात. डॉक्टर मिळालेल्या वेळेत त्यांच्यावर उपचार करतात. परंतु मृत्यूनंतर त्याचे खापर सरकारी दवाखान्याचेवर फुटते. परंतु यावरून विरोधी पक्षांना राजकारण करायचे आहे. महाविकास आघाडीच्या काळात सर्व शासकीय रुग्णालयांचे ऑडिट करणार, अशी घोषणा करण्यात आली होती. प्रत्यक्षात किती रुग्णालयांचे ऑडिट झाले? असा सवालही चित्र वाघ यांनी केला.