हदगाव, शे.चांदपाशा| हदगाव तालुक्यातील काँग्रेसचे जेष्ठ नेते नादेड जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष आनिल पाटील बाभळीकर यांना मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ‘कुणबी ‘जातीचे प्रमाणपञ तालुक्यातून प्रथम मिळवण्याचा ‘मान ‘ मिळालेले असुन त्यांना हदगाव तालुक्याच्या उपविभागीय आधिकारी अरुणा संगेवार यांच्या हस्ते देण्यात आले आहे.
निजामकालीन नोंदीची तपासणी करण्याचे आदेश शासनाने जारी केले होते. त्यामध्ये अनेक मराठा समाजातील जुन्या निजामकालीन ‘कुणबी ‘जातीचे निर्गम त्यांच्या प्राथमिक शाळेतून शोधुन काढले. या सर्वाचा पाठपुरावा आनिल पाटील बाभळीकर यांनी केला. तालुक्यातील प्रथम कुणबी प्रमाणपञ मिळवण्याचा मान त्यांना मिळालेले आहे. ते काँग्रेसचे तालुक्यातील जेष्ठ नेते असुन, या पुर्वी त्यांनी विविध पदे यशस्वीपणे पार पाडली.
ते माजी जि.प. सदस्य असुन माजी मुख्यमंत्री आशोक चव्हाण यांच्या खास मर्जीतील विश्वासू आहेत. त्यांचा तालुक्यात बराच चाहता वर्ग असुन, त्यांना आता ‘कुणबी ‘प्रमाणपञ ‘मिळाल्याने समाज माध्यमावर त्यांच्या चाहत्याकडून ‘आता आरक्षणातुन निवडणूक लढविणार का…? असा प्रश्न गंमतीने त्यांना विचारण्यात येत आहे.