हिमायतनगर। नांदेड येथील शंकरराव चव्हाण, शासकीय रुग्णालयाच्या अधिक्षकांने हिंगोली जिल्ह्याचे खासदार हेमंत पाटील यांच्यावर खोटी दाखल केलेला अट्रासिटी चा गुन्हा मागे घेण्यात यावी अशी मागणी मागे हिमायतनगर तालुका प्रहार संघटनेच्या वतीने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हिमायतनगर तालुका प्रहार संघटनेचे अध्यक्ष दत्ता पाटील देशमुख यांनी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नांदेड येथील शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयाचे अधिक्षक यांनी रुग्णालयात सर्वत्र दुर्गंधी पसरली असताना साफसफाईकडे लक्ष न दिल्यामुळे रुग्णालयातील रुग्णांच्या आयुष्याशी खेळ झाला आहे. त्यांचे साफसफाई कर्मचारी यांचे तेथील कर्मचारी व अधिकारी यांच्या कामाकडे लक्ष नसुन, सदरील प्रकरण त्यांच्या दुर्लक्षामुळे घडलेले आहे.
त्यामुळ या प्रकरणात सदरील अधिक्षक हे 100 टक्के गुन्हेगार आहेत. हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील हे लोकप्रतिनिधी असल्या कारणाने लोकांच्या मागणीनुसार लोकांच्या समस्यानुसार त्यांनी ही साफसफाई मोहिम हाती घेतली. मोहिम हाती घेतांना अधिक्षक यांना साफसफाई करायला लावली व स्वतः ही हातात पाईप घेऊन पाणी मारत स्वच्छता केली. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही ॲट्रॉसिटी सारखा गुन्हा दाखल होऊ नये. कारण त्यांनी जातीवाद किया शिवीगाळ केली नाही. हे जातीचा आधार घेऊन असे खोटे गुन्हे दाखल होत असतील तर प्रहार जनशक्ती पक्षाला रस्त्यावर उतरावे लागेल. प्रत्येक अधिकाऱ्यासोबत याच पध्दतीने वर्तणुक करावी लागेल असेही निवेदनात म्हटले आहे.
त्यामुळे हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांच्यावरील खोटा ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल केलेला आहे. तो तात्काळ रद्द करावा व तेथील कर्मचारी, अधिकारी साफसफाई कामगार याना ताकीत व समज द्यावी. आणि सदर प्रकरण हे जागच्या जागेवर थांबवावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर प्रहार चे तालुकाध्यक्ष दत्ता पाटील देशमुख यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरी आहेत.