नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून देणार-आ. मोहनराव हंबर्डे

By
NewsFlash360 Staff
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या,...
1 Min Read
Disclosure: This website may contain affiliate links, which means I may earn a commission if you click on the link and make a purchase. I only recommend products or services that I personally use and believe will add value to my readers. Your support is appreciated!

नवीन नांदेड l गोदाकाठी वसलेला नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा म्हणून ओळखल्या जाणार्‍या नंदगिरी किल्ल्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आपण वैयक्तिक लक्ष घालणार असून त्यासाठी आवश्यक लागणारा निधी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा नांदेड दक्षिणचे आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केली. जुन्या नांदेड भागात स्थित असलेला नंदगिरी किल्ल्यास आ. मोहनराव हंबर्डे यांनी भेट देवून पाहणी केली.त्यांच्यावतीने किल्ला परिसरात दगडी चुरी टाकण्याचेही काम सुरु करण्यात आले.ते म्हणाले, हा किल्ला म्हणजे नांदेड जिल्ह्याची शान असून किल्ल्याला ऐतिहासीक वारसा आहे.

गोदावरी नदी तीरावर असलेला हा किल्ला पर्यटनच्या दृष्टीनेही तितकाच महत्त्वाचा आणि आकर्षक आहे.गेल्या अनेक वर्षांपासून किल्ल्याची दुरवस्था झाली आहे. किल्ल्याचे उत्तम संवर्धन आणि डागडुजी केल्यास देश -विदेशातील पर्यटकांसाठी नंदगिरी किल्ला विशेष आकर्षण ठरणार आहे. हा केवळ किल्ला नसून नांदेडकरांचा ऐतिहासीक आणि सांस्कृतिक वारसा आहे आणि तो जपण्यासाठी नंदगिरीला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वैयक्तिक लक्ष घालून आवश्यक तो निधी उपलब्ध करून देवू, असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी नंदगिरी किल्ल्याच्या संवर्धनासाठी अथक परिश्रम घेणारे नंदगिरी किल्ल्याचे युवा शिलेदार प्रामुख्याने उपस्थित होते. त्या सर्व युवा वर्गाचे त्यांनी अभिनंदन केले. नांदेड शहराची ऐतिहासिक परंपरा जोपासण्यासाठी हे सर्व युवा गेल्या अनेक दिवसांपासून घेत असलेले परिश्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले.

Share This Article
या वृत्तवाहिनी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या जश्यास तश्या कॉपी करून प्रकाशित केल्या तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराइट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तवाहिनी वृत्त वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख किंवा मजकुराचे पुनरावलोकन करू शकत नाही. त्यामुळे दिग्दर्शक/संपादक कदाचित त्याच्याशी सहमत नसतील. याद्वारे उद्भवणाऱ्या कोणत्याही प्रकरणासाठी संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी आणि जाहिरातदार पूर्णपणे जबाबदार असतील. या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातम्या किंवा मजकुराबद्दल उद्भवणारे कोणतेही वाद हिमायतनगर न्यायालयांच्या अधीन असतील.
Leave a Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!