नांदेडलाईफस्टाईल

आयुष्यमान गोल्डन कार्डसाठी संपूर्ण जिल्हाभर 28 डिसेंबर रोजी विशेष मोहिम

नांदेड| सर्वसामान्यांना वैद्यकिय उपचारासाठी अत्यंत लाभदायी असलेली योजना म्हणून आयुष्यमान भारत योजनेकडे पाहिले जाते. आयुष्यमान गोल्डन कार्ड लाभार्थ्यांकडे असणे या योजनाच्या लाभासाठी आवश्यक आहे. जिल्ह्यातील ज्या लोकांना अजूनही आयुष्यमान गोल्डन कार्ड मिळाले नाही अथवा ज्यांनी अजूनही या कार्डसाठी अर्ज भरले नाहीत अशा व्यक्तींसाठी संपूर्ण जिल्हाभर विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे.

दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत, नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी संस्था (शाळा), अंगणवाडी केंद्र, सर्व आरोग्यवर्धिनी केंद्र, ग्रामपंचायत कार्यालय, गावातील मुख्य ठिकाण, चौक, रेशन दुकाने, सेतु सुविधा केंद्र, गर्दीची ठिकाण ही विशेष मोहिम राबविली जाणार आहे. या मोहिमेचा अधिकाधिक नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

दिनांक 28 डिसेंबर रोजी जिल्ह्यात किमान एक लाख आयुष्यमान कार्ड लोकांपर्यंत पोहोचावेत यादृष्टिने आरोग्य विभाग व सर्व संबंधित विभागाच्या माध्यमातून नियोजन केले गेले आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्यमान उंचावण्यासाठी मोफत आरोग्य सुविधांची भूमिका महत्वाची आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणीही उपचार, शस्त्रक्रिया पासून वंचित राहू नये यासाठी राज्यस्तरावरुन महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाची आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेच्या संलग्न रुग्णालयातून मोफत उपचार व शस्त्रक्रिया लाभ दिला जातो. या योजनेचे गावनिहाय लाभार्थी यादीतून डाऊनलोड करणे, गोल्डन कार्ड तयार करणे व नागरिकांमध्ये जागृती करुन या योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांची आर्थिक परिस्थिती अजून बिकट होणार नाही व योग्य उपचार मिळून त्यांना आरोग्य प्राप्ती होईल असा या योजनेमागचा उद्देश आहे.

27 डिसेंबर रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन
ग्राहकांचे हक्‍क व ग्राहक संरक्षण कायदा याबाबत जनजागृती होण्‍याच्‍या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुधवार 27 डिसेंबर 2023 रोजी राष्‍ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम येथील जिल्‍हाधिकारी कार्यालय नियोजन भवन कॅबिनेट हॉल येथे दुपारी 1 वा. होणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्‍हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्‍यक्षस्थानी जिल्‍हा ग्राहक तक्रार निवारण मंचाचे अध्‍यक्ष अनिल ब.जवळेकर हे राहतील.

या कार्यक्रमास प्रमुख वक्‍ते म्हणून ग्राहक पंचायत महाराष्‍ट्रचे जिल्‍हा अध्‍यक्ष डॉ. अरविंद बिडवई, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा.डॉ.दीपक कासराळीकर, जिल्‍हा संघटक नांदेडचे अॅड. आनंद बळवंतराव कृष्‍णापूरकर, जिल्‍हा उपाध्‍यक्ष प्रा. डॉ. दीपक कासराळीकर, जिल्‍हा सहसंघटक सायन्‍ना मठमवार यांची उपस्थिती राहणार आहे. राष्‍ट्रीय ग्राहक दिनाच्‍या या कार्यक्रमास सर्व नागरिक, ग्राहकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्‍हा पुरवठा अधिकारी रुपाली चौगुले व तहसिलदार संजय वारकड यांनी केले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!