
नांदेड। नांदेड येथील रहिवासी प्रा. वैभव वि.कुलकर्णी अंबुलगेकर यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातर्फे फार्मास्युटिकल सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयात विद्यापीठाच्या 26 व्या दीक्षांत समारंभात दि.25 सप्टेंबर 2023 रोजी पीएच.डी पदवी प्रदान करण्यात आली. सदर
पीएच. डी संशोधनास मार्गदर्शक म्हणून डॉ.ललित वि. सोनवणे, डॉ. तुकाराम एम.कल्याणकर, तसेच डॉ. राजेश्वर क्षिरसागर, प्राध्यापक स्कूल ऑफ फार्मसी युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट , स्वा.रा.ती.म यांचे मार्गदर्शन मिळाले ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री विजयकुमार कुलकर्णी अंबुलगेकर यांचे चिरंजीव आहेत त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
