धनेगाव जिल्हा परिषद शाळा येथे ३० जुलै रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

नवीन नांदेड l शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धनेगाव तसेच ग्रामपंचायत कार्यालय धनेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने आपल्या धनेगाव चे प्रथम नागरिक सरपंच शगंगाधर पाटील शिंदे साहेब तसेच मा. जि प. सदस्य मनोहर पाटील शिंदे व श भुजंगराव भालके व समस्त ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हा परिषद शाळा धनेगाव येथे ३० जुलै रोजी सकाळी ९ ते १ वाजेपर्यंत करण्यात आले आहे.
या शिबीर मध्ये रक्त लघवीच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत, गरोदर मातांची तपासणी लहान मुलांची तपासणी, असंसर्गजन्य आजारा ची म्हणजेच बीपी व शुगर थायरॉईड अशा गंभीर आजारांची तपासणी पूर्णपणे मोफत होणार असूनआवश्यक रुग्णांवर उपचार सुद्धा केला जाणार आहे.
गावातील सर्व ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे. सदरील शिबिराची माहिती आपल्या कुटुंबातील सदस्यांना व गरजू रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.अमित रोडे (स.आरोग्य अधिकारी) प्राथमिक आरोग्य उपकेंद्र धनेगाव ता. जि. नांदेड यांनी केले आहे.
